पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ (४५) स्वामी श्रद्धानंद यांचे टिळकाना पत्र कांगडी गुरुकुल १ जुलै १९२० वेदिक मासिक व गुरुकुल समाचार याचा स्वतंत्र अंक आम्ही लवकरच काढणार आहोत. अनेक लोकांचे लेख मागविले आहेत. पण तुमच्या लेखाने या अंकाला विशेष शोभा येणार आहे. स्वामी दयानंद यांच्यासंबंधाने त्यांच्या कोण- त्याहि कार्याला उद्देशून आपल्याला जे मनमोकळेपणाने लिहावेसे वाटेल ते लिहा. (४६) विठ्ठलभाई पटेल यांचे टिळकाना पस लंडन ७ जुलै १९२० लीड्स व ब्रेडफोर्ड येथे जाऊन आलो. पंजाब प्रकरणी व्याख्याने दिली. स्वयंनिर्णयानुसार हिंदुस्थानाला स्वराज्य मिळावे असा ठराव मंजूर करून घेतला. ३ ऑगष्टच्या सुमाराला येथून निघतो. मी येथून लवकर निघावे असे मला अनेक स्नेहीमंडळ कडून लिहून आले आहे. पार्लमेंटरी पार्टीने असहकारितेसंबंधाने जो ठराव केला त्याविषयी बरीच चर्चा झाली. स्पूर व वेजवुड याना त्यासंबंधाने काहीच माहिती नाही. ते म्हणतात आम्ही हिंदी गृहस्थ असतो तर या चळवळीला जाऊन मिळालो असतो. पण आताच तुम्ही असे करा असा सल्ला आम्हाला या क्षणी देता येत नाही. बेझंटबाईनी लॅन्सबरी व स्कर यांच्या हातून तो ठराव कर वून घेतला. क्लाइन्स यांचे म्हणणे असे की ही चळवळ हिंदुस्थानात झाल्याने आमचे हात खंबीर रहाणार नाहीत पण कोणी उलटहि म्हणतात. ब्रिटिश कमि- टीचे काम चालावे तसे चालत नाही. मी समक्ष सर्व हकीकत सांगेन. बमनजी- साहेब भेटले. ते अलवारचे महाराज वगैरे लोक अशी खटपट करीत आहेत की चेम्सफर्ड यांचे जागी माँटेग्यू यांची नेमणूक व्हावी. पण त्याना ते माहीत नाही की चेम्सफर्ड याना परत बोलावले तर माँटेग्यू याना राजीनामा द्यावा लागेल. (४७) हिल्डा हौसीन यांचे टिळकाना पत्र लंडन ८ जुलै १९२० येथे अनेक ठिकाणी सभांची व्यवस्था मी केली आहे. असहकारितेच्या चळवळीवर मी व्याख्यानात अजून कशाच प्रकारचा अभिप्राय देत नाही. कारण अजून त्या गोष्टीचा निर्णय राष्ट्रीय सभेकडून लागावयाचा आहे. पण तूर्त डायर ओडवायर चेम्सफर्ड यांच्या निषेधाचे ठराव मात्र मी करवीत आहे. व्याख्या- नांचा सारांश मी पाठवून देईन. राष्ट्रसंघाची शाखा ज्या देशात आहे तेथे राष्ट्रीय सभेतर्फे मतप्रसाराचे काम करण्यासंबंधाने गेल्या राष्ट्रीय सभेत ठराव पसार झाला आहे. येथील एक ग्रंथप्रकाशक प्रारंभी ३००० पौंड घालून चहूकडे पुस्तके हस्तपत्रके छापून मतप्रसाराचे काम करीन म्हणतो तरी त्याचे हे ३०००