पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ८८ धर्मशास्त्रावर पुस्तक लिहावे. ही मी सूचना आपणास किर्तादा केली आहे ? गीता- रहस्याप्रमाणेच हा ग्रंथ लिहिल्याने या राष्ट्रावर तुमचे अगणित उपकार होणार आहेत. मी एक वेडगळ ध्येयाभ्यासी ( fuddist ) आहे असे वाटल्यास म्हणा. पण मंडालेहून तुम्ही आल्यापासून मी जो आपल्या पाठीमागे या बाबतीत एक- सारखा लागलो आहे याचे कारण आपणाशिवाय या बाबतीत मला दुसरा कोणीहि अधिकारी पुरुष दिसत नाही. हे सुचविताना मर्यादेचे अतिक्रमण झाले असल्यास क्षमा करावी. (४३) मिस नॉर्मैटन बाईंचे टिळकाना पत्र लंडन १७ जून १९२० यासोबत एक हस्तपत्रक पाठवीत आहे. ते तुम्हाला पसंत पडेल असे मला वाटते. इंग्रज स्त्रियांची एक मोठी सभा मी भरवीत आहे व हिंदुस्थानातील स्त्रियांची वागवणूक व त्यांचे हक्क हे विषय सभेपुढे आणणार आहे. आमच्या वक्त्यापैकी एक जण विशपच्या दर्जाचा आहे. लेडी कोर्टने याहि येणार आहेत. तुम्ही शिष्टमंडळाचे लोक पुनः परत येणार नाही का ? याल तर संधि बरी आहे. वक्त्यामध्ये हिंदी लोक नाहीत याची मोठी उणीव वाटते. तुम्ही गेल्यापासून आम्हाला चुकल्या चुकल्यासारखे वाटते व तुमच्याबद्दल इकडे लोक विचारतात. 'इंडिया' पत्राचे हल्लीचे धोरण तुम्हाला कसे काय आवडते ? कमांडर केनवर्दी म्हणत होते की हल्ली पार्लमेंटच्या सभासदाना इंडिया पत्राचा बराच उपयोग होतो. तुम्ही आपल्या सहीचा एखादा लेख 'इंडिया'ला पाठविणार नाही का ? (४४.) दुर्गादास आडवानी यांचे केळकराना पत्र कराची २५ जून १९२० गतवर्षी पंजाब व सिंध या प्रांतात ज्या कित्येक गृहस्थाना तुरुंगाच्या शिक्षा झाल्या त्या लोकाना येत्या कौन्सिल निवडणुकीना नवीन कायद्याप्रमाणे उभे राहता येत नाही ही गोष्ट यापूर्वीच तुमच्या लक्षात आली असेल. अर्थात त्यानी निवडणुकीला उभे रहावयाचे तर त्यांच्यावरील नालायकीचा शेरा सरकारी हुकमाने निघाला पाहिजे व तो निघण्याला त्याना माफी देण्यात आली पाहिजे. तरी या बाबतीत टिळकांचा सल्ला घेऊन तुम्ही ताबडतोब विलायतेत पटेल याना तार कराल काय ? नियमांची इतर दुरुस्ती करिताना अशीहि एक दुरुस्ती झाली पाहिजे की राजद्रोहाच्या गुन्ह्याकरिता शिक्षा झालेल्या लोकाना निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहण्याला हरकत होऊ नये. तरी पटेल याना ताबडतोब तार करावी.