पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

612 लो० टिळकांचे चरित्र भाग ६ लिहून पाठवीत आहे. थोड्याच दिवसानी मी समक्ष कमिटीपुढे हजर होईन. नियमांची चर्चा करण्याकरिता लॉर्ड सिंह यानी मला बोलाविले आहे. सर शंकरन नायर यांचा फार उपयोग झाला. स्पूर व वेजवुड याना मी माहिती देत आहे. इंटर कमिटीच्या रिपोर्टाचा सारांश काढून मी त्याना देतो. या वेळी इकडे पाच सहा पुढारी असते तर हवे होते. पण मी एकटाच आहे. इकडील वर्तमानपत्रा- 'काही उतारे पाठवीत आहे. बेझंटबाईनी पंजाब प्रकरणी प्रधानमंडळाचे सम- र्थन चालविले आहे असे समजते. नियमांचे काम कमिटीपुढे ऑगस्ट सप्टेंबर- पर्यंत चालेल. तुम्ही गुजराथेत जाणार होता त्यांचे काय झाले. कदाचित कौन्सिल ऑफ स्टेटकरिता उमेदवार म्हणून उभे राहण्याचा माझा विचार आहे तरी उमेदवार म्हणून माझे नाव प्रसिद्ध करा व मजकरिता थोडी खटपट करा. तून (४०) लजपतराय यांचे टिळकाना पल लाहोर १० जून १९२० हर्डीकरांची पत्रे पैशासंबंधाने आली. तूर्त त्याना एक हजार डॉलर पाठ- वावे. मात्र ते जपून खर्च करण्याला लिहावे. न्यूयॉर्क येथील ऑफिससंबंधाने केळकर याना सविस्तर पत्र लिहिले आहे ते ते तुम्हाला दाखवितीलच. (४१) पिसुर्लेकर यांचे टिळकाना पत्र गोवा ११ जून १९२० प्राचीन काळी अमेरिकेत हिंदू व बौद्ध लोकांच्या वसाहती झाल्या होत्या असे अनेक पाश्चात्य ग्रंथकारांच्या आधाराने मी एका पोर्तुगीज निबंधात दाख- विले होते. ते मत काही युरोपियन पंडिताना मान्य झाल्याचे दिसते. तरी सोबत पाठविलेल्या निबंधाचे फ्रेंच भाषांतर पाहून आपला अभिप्राय कळवावा. आपल्या ग्रंथाची माहिती पोर्तुगीज वाचकास देण्याविषयी मी यथाशक्ति प्रयत्न करीत आहे व लिहिण्यास आनंद वाटतो की आपल्या आर्टिक होम इन दि वेदाज या ग्रंथातील मते कित्येक प्रमुख पोर्तुगीज लोकाना मान्य झाली आहेत. (४२) मुंजे यांचे टिळकाना पत्र नागपूर १६ जून १९२० अस्पृश्य वर्गांची परिषद नागपुरास कोल्हापूरचे महाराज यांचे अध्यक्षते- खाली भरावयाची आहे. राष्ट्रीयपक्षातील माझ्या एका स्नेह्यानेच ही परिषद नाग- पुरास बोलाविली आहे. त्याचे मला आलेले पत्र आपणास अवलोकनार्थ पाठ- वीत आहे. त्यातील सूचना स्वतः मला सर्वसाधारण रीत्या संमत आहेत. पण आपल्या हिंदुधर्मशास्त्राचा त्याला आधार असलेला बरा. स्थानिक किरकोळ वादातून तुम्ही आपले अंग काढून समाजधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे हिंदु-