पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ८६ (३७) सकलातवाला यांचे टिळकाना पत्र ट्विकनहॅन २० मे १९२० वाइटाबरोबर काही चांगलेहि वारा वाहून नेतो. तसे बेझटबाईंनी जो हल्ली द्वाडपणा चालविला आहे त्या हकीगतीबरोबरच तुमच्या कडून जी पत्रे व पुस्तके आली ती वाचून फार समाधान वाटले. येथल्या लोकापुढे ही गोष्ट मांडतो. पण खरे सांगावयाचे तर त्या माँटेग्युसुधारणा ती पार्लमेंटरी कमिटी आणि तो बेझंट बाईचा वाद याकडे इकडे कोणीच लक्ष देत नाही. पांच वर्षापूर्वी या 'चेटकी ' बाईपासून मी दूर राहिलो तर लंडन येथील माझ्या हिंदी स्नेह्यानी माझ्यावर कोण गहजब केला. असली माणसे म्हणजे दुधारी शस्त्रेच होत. त्यांचा उपयोग करून घ्यावा असा मोह होतो खरा. पण ती चूक आहे. आपण हिंदी लोकानी एकंदर जगातील चळवळीच्या दृष्टीने स्वराज्याच्या लढ्यात लढले पाहिजे. येथील लोकशाही मताचे लोक पार्लमेंट सभाच ' अप्रातिनिधिक ' म्हणून नाराज. तर तिकडे तुम्ही नव्या कौन्सिलाना पार्लमेंटच्या जोडीस नेऊ पाहता ! आपल्या इक- डील हिंदी पंचायतीना थोडा नवा संस्कार देऊन सोव्हिएट पद्धतीवर नेऊन काम केले पाहिजे. तिकडे हिंदुस्थानात तुम्ही 'इंटर नॅशनल कम्युनिस्ट लेबर पक्ष' का स्थापन करीत नाही ? तेथे असा पक्ष स्थापा व मला त्याचा प्रतिनिधि निवडा. म्हणजे तुमचा प्रतिनिधि म्हणून मी येथे लंडनमध्ये काम करीन. (३८) शौकतअल्ली यांचे टिळकाना पत्र मुंबई २६ मे १९२० ता. १ जून रोजी अलाहाबाद येथे परिषद भरणार आहे. तरी आपण तेथे यावे. आम्ही शंभर प्रमुख लोकाना निमंत्रणे पाठविली आहेत. नेमस्त पुढाऱ्या- नाहि बोलाविले आहे. हेतु हा की कोणाचीहि पुढे तक्रार राहू नये. काही मौल- नाहि बोलाविले आहे. गेल्या २३ तारखेला पुण्यास मोठी सभा भरली होती असे कळले. मला वेळी कळते तर मीहि आलो असतो. कारण माझ्या राजकारणातील गुरूना मला अभिवादन करिता आले असते. महमदअल्ली हा फ्रान्समध्ये हल्ली आहे. तो लिहितो की ' इंग्रज आमचे हितविरोधी आहेत. आणि फ्रान्स व इटली यांचीच काही झाली तर मदत होईल. सर्वानी एकदिलाने प्रयत्न केल्यास काही फल हाती लागेल, ' (३९) व्ही. जे. पटेल यांचे टिळकाना पत्र लंडन ३ जून १९२० या आठवड्यात अंडर सेक्रेटरीकडून एक पत्र आले. त्यावरून सुधार- पांच्या कायद्याखाली होणाऱ्या नियमाविषयी सूचना व सुधारणा थोडथोड्या