पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ (३५) फजलूल हक्क यांचे टिळकाना पत्र कलकत्ता १९ मे १९२० आपला देशी व्यापार बंदराबंदराने चालविण्याकरिता देशी व्यापारी गल- ते जरूर आहेत ही गोष्ट आपण जाणताच. अशी जहाजे नसल्यामुळे देशाचे फार नुकसान होत आहे. युरोपियन कंपन्यावर अवलंबून रहावे लागल्याने फार तोटा व गैरसोय होते. ही स्थिति पालटण्याकरता काही प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'इंडो बर्मा स्टीम नॅव्हिगेशन कंपनी' या नावाची एक कंपनी आम्ही काढीत आहो. तिचे भांडवल पांच कोटी रुपये योजिले आहे. लाला हरकिसन लाल व व्योमकेश चक्रवतीं यानी डायरेक्टर होण्याचे कबुल केले आहे. चितेगांग येथील अबदुल रहमान यांची दर्यावर्दी पेढी विकत घेण्याचे आम्ही ठरविले आहे व ती थोड्या किंमतीला मिळणार आहे. एखादा जाणता युरोपियनहि नोकरीला ठेऊ. तरी आपण या कामात आम्हाला सहाय करावे व आपली सहानु- भूति असावी. (३६) विठ्ठलभाई पटेल यांचे टिळकाना पत्र लंडन १९ मे १९२० पूर्वी पत्र लिहिल्यानंतर ब्रिटिश कमिटीची सर्वसाधारण सभा पार्लमेंटच्या सभागृहात भरली होती. तिने एक स्पेशल कमिटी पंजाबच्या कामासंबंधाने नेम- ण्याचे ठरविले आहे. मि. नेव्हिल यांची योजना या कामावर करण्याचा विचार आहे. जूनमध्ये लंडन शहरी या प्रकरणी एक मोठी सभा भरवू म्हणतो. सेंट निहाल सिंग याना आमच्याशी सहकारिता करण्याची विनंति केली. पण ते पक्के असे काहीच बोलत नाहीत. त्यांचा विचार काय आहे न कळे. पार्लमेंटच्या सभासदांची मधून मधून गाठ घेत असतो. परंतु जॉइंट कमिटीची सभा पुनः होईपर्यंत रिफॉर्म अॅक्टाखालील नियमांची चर्चा होऊ शकत नाही. तथापि या नियमांच्या मसुद्यांची चर्चा खुद्द स्टेट सेक्रेटरीशी करण्याचा माझा विचार आहे व त्याकरिता त्याना मी लिहिले आहे. तुर्कस्तानचा प्रश्न निकालात निघाला. असहकारितेच्या चळवळीला कोणते स्वरूप येते याकडे इकडील लोकांचे लक्ष लागले आहे. सर्व हिंदुस्थानभर खिलाफतीच्या चळवळीबरोबर असहकारितेची चळवळ सुरू करण्याचे ठरले तर तीत पूर्ण जबाबदारीचे स्वराज्य एकदम देण्याची मागणी घालता येणार नाही का ? जर तशी मागणी घालता येण्या- सारखी असेल तर कितीहि स्वार्थत्याग पडला तरी ती चळवळ करावी असे मला वाटते.