पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ८४ नये. लिबरलपक्षाच्या काही सभासदाना भेटत आहे. तसेच मजूरपक्षाचे दोन्ही उपपक्ष एकदिलाने या कामी वागतील अशी मी खटपट करीत आहे. बेझंट बाईच्या युनाइटेड इंडिया पत्राने मजवर टीका करूनच माझे स्वागत केले आहे ! (१२) जी पी. ब्लिझर्ड यांचे टिळकाना पत्र लंडन १३ मे १९२० काल ब्रिटिश कमिटीच्या सांगण्यावरून तुमच्याकडे मी तार केलीच आहे. पटेल यानीहि खालील अर्थाची तार केली आहे. 'पंजाबासंबंधी येथे जी काय चळवळ करावयाची ती सर्व काँग्रेस कमिटी मार्फतच झाली पाहिजे. त्याब- द्दल येथे विशेष आग्रह आहे. नाही तर कदाचित् कमिटीहि मोडण्याचा संभव. व्हिल याना तार करून सर्व रिपोर्ट व फंडाचे पैसे ब्रिटिश कमिटीकडे देण्याला सांगा. ते स्वतंत्र रीतीने सरकारशी बोलणे चालणे करतात ते थांबले पाहिजे. कारण कॉंग्रेसच्या धोरणाशी ते विसंगत आहे. सर्व चळवळ पार्लमेंटमध्ये किंवा बाहेर करण्याची ती ब्रिटिश कमिटीच्या हातीच राहिली पाहिजे. तरी याकडे ताब- डतोब लक्ष द्यावे. (३३) ब्लीझर्ड यांचे टिळकाना पत्र लंडन १४ मे १९२० पूर्वीचे पत्र लिहिल्यानंतर नेव्हिल यानी आमच्याकडे पंजाबसंबंधी फंड व काँग्रेस कमिटीच्या रिपोर्टाच्या एक हजार प्रती देण्याचे कबूल केले आहे. इंटर कमिटीचा रिपोर्ट काँग्रेस कमिटीचा रिपोर्ट आणि येथील ब्रिटिश काँग्रेस कमि- टीचा रिपोर्ट या सर्वोचा थोडक्यात सारांश काढून पार्लमेंटचे सभासद वर्तमान- पत्रकर्ते व राजकीय संस्था यांच्याकडे पाठविण्याचा आमचा विचार आहे. (३४) डॉ. हर्डीकर यांचे गोखल्याना पत्र न्यूयॉर्क १८ मे १९२० पैसे तारेने पाठविल्यास बरे होईल. आमच्या संस्थेचे नाव बदलणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याबद्दल मी पुण्यास व लालाजीना लिहिले होते. सध्या या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध बरीच खळबळ झाली असून उलट त्यानीहि आपले काम जोराने सुरू केले आहे. आमची संस्था तूर्त तिच्या नावामुळे कात्रीत सापडली आहे. विचार करीत आहो. शक्य असेल तर नाव बदलू, कॉंग्रेसच्या व पुण्याच्या संस्थेला कोणत्याहि तन्हेने बाध येणार नाही अशी खबरदारी घेऊ.