पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०. लो० टिळकांचे चरित्र भाग १ आले असतील तरी खटपट करण्याची हीच वेळ आहे. स्वतः तुम्ही या कमिटीत नाही तरी साताऱ्यास समेटाचा प्रश्न पुढे आणण्याची मुख्य खटपट तुम्हीच केली. तशीच आतां टिळक व गोखले या उभयतांचे स्नेही म्हणून तुम्ही खटपट कराल तर तिला यश येण्याचा संभव आहे. (१०) आळतेकर यांचे केळकराना पत्र कऱ्हाड १६ नोव्हेंबर १९१४ संयुक्त राष्ट्रीय सभेसंबंधाने माझ्या सूचना ऑल इंडियाकाँग्रेस कमिटी- कडे चेअरमन ( सर सुब्रहाण्य अय्यर ) यानी पाठविल्याच आहेत. आता त्यांची उत्तर आली म्हणजे राष्ट्रीय पक्षातील प्रमुख लोकानी एकत्र जमून आपला विचार ठरवावा असे वाटते. टिळक मोतिलाल घोस व तुम्ही मिळून खास राष्ट्रीय- पक्षाचे म्हणणे काय असेल ते निश्चित ठरवून मांडावे. टिळकांनी या कामात लक्ष घालावे असे नेमस्तानांहि वाटत असावे असे दिसते. बेझंटवाईची इच्छा टिळ- कानी काँग्रेसला हजर राहून समेट घडवून आणावा अशी आहे. (११) बाबू मोतिलाल घोस यांचे केळकराना पत्र देवघर २० नोव्हेंबर १९१४ मी हल्ली देवघर येथे आलो आहे हे तुम्हाला टिळकांनी सांगितलेच असेल. अळतेकर यांनी सर सुब्रहाण्य अय्यर याना पत्र पाठविले ते पाठवावयास नको होते. सर सुब्रह्मण्य यांचे आक्षेप काय आहेत हे माझ्या लक्ष्यात नाही. पण हल्लीच्या काँग्रेसकमिट्यांचा अधिकार जाईल अशी भीति त्याना कदाचित् वाटत असावी. पण त्याला उपाय आहे तो असा की जाहीरसभा बोलवावयाच्या त्या हल्लीच्या काँग्रेसकमिट्यानी बोलवाव्या किंवा नव्या क्रीडवर सह्या केलेल्या लोकानी बोल- वाव्या. असे केले म्हणजे झाले तरी यासंबंधाने तुमचे मत कळवा. भूपेंद्रनाथ मला लिहितात की मोहरमच्या आठवड्यात कलकत्ता किंवा अलाहाबाद येथे बेझ- बाईना बोलावून लहानशी खासगी सभा भरखूं. (१२) एन् सुबराव यांचे केळकराना पत्र मद्रास २२ नोव्हेंबर १९१४ जाहीर सभानी प्रतिनिधी निवडण्याचे बाबतीत एक टिपण करून मी या सोबत तुमच्याकडे पाठवीत आहे. तुमच्या दुसऱ्या मुद्यासंबंधाने अद्यापि पूर्ण विचार केला नाही, पण समक्ष गाठ पडली असता त्याचा निकाल अधिक चांगला लावता येईल या हेतूने बेझंटवाई तिकडे जात आहेत. त्यांच्याबरोबर मीहि जावे म्हणतो. पाहावे काय घडेल ते. काँसेसच्या घटनेवरील टिप्पण मात्र न विसरता प्रसिद्ध करावे.