पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ आधारस्तंभ असेहि तुम्हाला मानतात. एक हिंदु या नात्याने तुम्ही येऊन काय उपदेश कराल त्याकडे लक्ष लागले आहे. (२९) दिवाण चमनलाल यांचे टिळकाना पत्र लाहोर १७ एप्रिल १९२० आम्ही येथे एक इंग्रजी साप्ताहिक काढणार आहोत. त्याचेच पुढे दैनिक करू. लाहोरपेक्षा दिल्ली हे ठिकाण या गोष्टीला चांगले पण इलाज नाही. लाला लजपतराय हरकिसनलाल वगैरे मंडळी डायरेक्टर बोर्डात घालणार आहोत. तुम्हीहि आपले नाव घालू द्याल काय ? संपादक मंडळीचे एक बोर्डच नेमणार आहोत. सुरवातीचे भांडवल तीन लक्ष रुपये व शेअर १०० रुपयांचा असे योजले आहे. पहिल्या अंकाकरिता लेख किंवा निदान आशीर्वाद पाठवावा. (३०) पंडित कृष्णशास्त्री यांचे टिळकाना पत्र पुणे १० मे १९२० मी पुण्यास काही हेतूने आलो, आपली भेट घेणे आहे. कर्नल ऑलकॉट यांचे वेळी अड्यार येथील ग्रंथसंग्रहालयाचा मी सात वर्षे अधिकारी होतो. पण मी थिऑसफिस्ट नाही. या अवधीत अनुभवाद्वैत या विषयावर ग्रंथ वाचला. ऑफ्रेट यानी या विषयावरील ग्रंथाचा आपल्या यादीत समावेश केला आहे हे आपणास माहीत असेलच. धर्म व तत्त्वज्ञान यांचा मी तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करीत असतो. मी आतापर्यंत ५७ ग्रंथांचे प्रकाशन केले आहे व त्यावर सुमारे एक लक्ष रुपये खर्च केले आहेत. हल्ली पैशाचे अभावी पुस्तकप्रकाशनाचे काम मी थांबविले आहे. अनुभवाद्वैत यालाच सांख्ययोग हे दुसरे नाव आहे. ते शंकरा- चार्योच्या तत्त्वज्ञानापेक्षा अधिक लोकसंग्रहकारक व व्यावहारिक आहे. गीतेचा अर्थ प्रवृत्तिपर तुम्ही लावला असे लोकानी मला सांगितले आहे. तरी मी आपले काम पुढे कसे चालवावे याविषयी तुमच्याकडून काही सूचना मिळतील अशी अपेक्षा आहे. (३१) व्ही. जे. पटेल यांचे टिळकाना पत्र लंडन १२ मे १९२० मी आल्यापासून ब्रिटिश काँग्रेस कमिटीच्या दोन सभा झाल्या. कमिटीने कॉंग्रेसकडे पैशाकरिता लिहिले आहे. एक हजार पौंड पाठविले असा जबाब आला. ते नेव्हिल याजकडे आले. पण आमच्याशी सहकारिता करून काम करण्याचा त्यांचा विचार दिसत नाही. स्टेट सेक्रेटरीकडे ते परभारेच बोलणे कर- णार असा रंग दिसतो. त्यांच्या सूचना नेमस्तानाहि नेमस्त वाटतील अशा आहेत. तरी काँग्रेसच्या नावाने बोलण्याचा नेव्हिल यांचा अधिकार यापुढे चालू देऊ