पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ८२ कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ही संस्था स्थापण्यात आली आहे. तिचे अध्यक्ष सेनेटर मॉना हे होतील असा अंदाज आहे. (२६) डॉ. हर्डीकर यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क १८ मार्च १९२० वॉशिंग्टन येथील सभेतील ठराव पाठविले ते पोचले असतीलच. येथे हिंदु मॉस्लेम - सोसायटी नावाची संस्था नुकतीच जन्मास आली आहे. 'यंग इंडिया' पत्राचे काम व्यवस्थित चालले आहे. वर्गणीदार वाढत आहेत. आम्हाजवळ सध्या फक्त तीन किंवा चार महिने पुरतील इतकेच पैसे आहेत. पुढे तिकडून पैसे न आल्यास मात्र काम बंद करावे लागेल. आपले इच्छेप्रमाणे कानडेशास्त्री यांची व्यवस्था करतो. (२७) डॉ. अन्सारी यांचे टिळकाना पत्र लखनौ २२ मार्च १९२० ता. २१ रोजी दिल्ली येथे प्रोपागँडा कमिटीची सभा भरून त्यात विठ्ठल- भाई पटेल याना विलायतेस पाठविण्याचे ठरले. जॉइंट कमिटीपुढे नवीन बिला- खाली सरकारने केलेले नियम चर्चेला निघतील तेव्हा त्यासंबंधाने काँग्रेसचे मत कमिटीपुढे मांडण्याचे काम पटेल यांजकडे दिले आहे. तरी यासंबंधाने आपण आपले मत कळवावे. हंटर कमिटीचा रिपोर्ट २१ एप्रिलपर्यंत प्रसिद्ध होत नाही असे समजते. याकरिता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची सभा पुढे ढकलावी लागत आहे. अशा रीतीने सभेच्या तारखा वरचेवर बदलाव्या लागत आहेत याबद्दल वाईट वाटते. पण एका दृष्टीने ते ठीकच आहे. कारण गांधींची प्रकृति बरी नसल्याने पंजाबातील अत्याचारासंबंधाने काँग्रेस कमिटीचा रिपोर्ट देखील तयार होण्याला वेळ लागणार आहे. ( २८ ) ताराजित प्रेमसिंग यांचे टिळकाना पल शिकारपूर २७ मार्च १९२० तुम्ही इकडे येणार हे ऐकून सगळ्या सिंध प्रांताला अतिशय आनंद झाला. इकडील हिंदु समाजावर शेकडो वर्षे मुसलमानांचा अंमल व त्यानंतर चकचकीत दिसणान्या पाश्चात्य भौतिक सुधारणा यामुळे आमच्या समाजाचा सत्यानास झाला आहे. राष्ट्रीय बुद्धि अशी उरली नाही. आहारविहार या बाबतीत धरबंध राहिला नाही. अहिंसा ही गोष्टच सर्व लोक विसरले. तरी तुम्ही इकडे आल्याने लोकाना सनातन हिंदु धर्माची काही तत्त्वे तरी समजतील. होमरूल लीगच्या चळवळीचे जनक असे तुम्हाला लोक इकडे समजतात, तसेच हल्लीच्या एकंदर राजकारणाचे