पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८१ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ न विचारता परस्पर आफ्रिकन सरकारकडे एक यादी लिहिली. कमिशनात हिंदी लोकाविरुद्ध असणारे बरेच आहेत. १९१४ साली गांधीशी झालेला पत्र व्यवहार कमिटीपुढे चर्चेला निघाला. गांधी यांची 'जुने हक्क' या शब्दाची व्याख्या फार संकुचित झाली आहे. या पत्रव्यवहाराची माहिती आम्हा लोकाना नव्हती. म्हणून तो पुढे काढल्यामुळे आमची फसगत झाली. जमीन धारण करण्यासंत्रं- धान दक्षिण आफ्रिकेतील निरनिराळ्या भागात निरनिराळे कायदे व वहिवाटी आहेत. हिंदुस्थान सरकारलाहि इकडच्या प्रश्नांची चांगली माहिती नसते. तुम्ही एकच असे पुढारी आहा की या परिषदेत काही तोड सुचवाल तिकडील एक दोन गृहस्थ इकडे माहिती घेण्याकरिता व साह्य करण्याकरिता पाठवाल काय ? तसेच आम्ही एखाद दुसरा प्रतिनिधि तिकडे पाठविल्यास उपयोग होईल काय ? (२४) डॉ. मुंजे यांचे टिळकाना पत्र नागपूर २४ फेब्रुवारी १९२० मुलामुलींच्या बाबतीत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची जी धामधूम पुण्यास झाली त्याची हकीकत वर्तमानपत्रातून वाचली. ती वाचून असे वाटले की आता स्थानिक पुढा-यानीच असल्या चळवळी अंगावर घेऊन आपणासारख्याना यातून मुक्त करावे. याच प्रसंगाने मी पूर्वी आपणाजवळ अमृतसरला बोललो होतो त्याची पुनः आठवण करून देतो. गीतारहस्याप्रमाणेच हिंदुधर्मशास्त्रावर ग्रंथ लिहिण्याचे काम आपण अंगावर घ्यावे. शेकडो वर्षामध्ये या विषयाचा शास्त्रीय रीतीने ऊहापोह झाला नाही. व सध्याच्या काळी आपणाशिवाय या कामाला दुसरा अधिकारी पुरुष मला दिसत नाही. गीतारहस्याप्रमाणेच युगप्रवर्तक असा हा नवीन ग्रंथ होईल. इतकेच नव्हे तर हिंदुधर्माविषयीच्या आपल्या कामगिरीचे हे दोन ग्रंथ म्हणजे एक चिरंतन स्मारक होईल. (२५) डॉ. हर्डीकर यांचे टिळकाना पस वाशिंग्टन (अमेरिका) ३ मार्च १९२० गेले काही दिवस मी वाशिंग्टन येथे काढले. काम संपताच न्यूयॉर्कला परत जाईन. येथे परराष्ट्रीय कारभारासंबंधाने काँग्रेसची कमिटी नेमण्यात आली आहे. तिच्यापुढे या सोबत पाठविलेले ठराव आम्ही प्रविष्ट करविले आहेत. ठराव काँग्रेसचे सभासद मिस्टर मेसन यांचे नावे गेले आहेत. या ठरावात अनेक कारणे देऊन शेवटी असे म्हटले आहे की 'हिंदुस्थानी राष्ट्राला' लोकांची इच्छा असेल त्याप्रमाणे म्हणजे त्यांचा स्वराज्य विषयक स्वयंनिर्णय असेल त्या- प्रमाणे, स्वराज्य देण्यास मदत करणे हे अमेरिकन पार्लमेंटाचे कर्तव्य आहे. याची चर्चा पुढे होईल ती कळवू. तेव्हा आपली बाजू मांडण्याची खटपट करू. यू. एस.