पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ८० येथील स्वागत मंडळाचा मी अध्यक्ष आहे. शिवाय मी गेल्या काँग्रेसचे वेळी मंडपात आपणाला भेटून आपले पादवंदन केले हे लक्षात असेलच. तसेच येरवडा येथील तुरुंगात तुम्ही ज्या खोलीत होता म्हणून सांगतात त्याच खोलीत मीहि दोन अडीच वर्षे वास्तव्य केले आहे. आपणाला भेटण्याला या प्रसंगी पंजाबातील काही पुढाऱ्यानाहि निमंत्रणे केली आहेत. (२१) श्रीराम शर्मा यांचे टिळकाना पत्र दिल्ली २२ फेब्रुवारी १९२० सनातन धर्म सभेच्यातर्फे हे लिहित आहे. हल्ली धर्मरक्षणाचे काम किती कठीण झाले आहे हे आपण जाणताच. हिंदुस्थानाला धर्मभूमि म्हणण्याचे दिवस गेले. हल्ली राजकीय चळवळीत जे पुढारी आहेत व ज्यानी त्या बाजूने काही केले सबरले आहे त्यांच्याच हाती देशाचे पुढारीपण आहे. दिल्ली येथे धर्म महासभेचे अधिवेशन मोठ्या प्रमाणावर भरविण्याचे आम्ही ठरविले आहे. तरी या सभेला आपण उपस्थित होऊन गीतेच्या आधारे आपल्या मुखाने आपल्याला वाटतो तो सनातन धर्म सांगावा अशी प्रार्थना आहे. येत्या मेमध्ये सभा भर- वाबी असा विचार आहे. परंतु तुमच्या सोयीवर सर्व अवलंबून आहो. (२२) ह. वि. फडके यांचे टिळकाना पव सांगली २४ फेब्रुवारी १९२० आपण येथे आल्यावेळी महार चांभारांच्या वतीने केलेली पानसुपारी स्वीकारलीत या योगाने आमच्या कार्याला उत्तेजन आले आहे. आपण येथे सांगितले की ' अस्पृश्यतेस भागवत धर्मात आधार नाही. मी धर्मपुस्तके वाचली आहेत. नारायणशास्त्री मराठे यानी उलट सांगितले. अर्थात् त्यांच्या व आपल्या भागवत धर्माच्या व्याप्तीत काही फरक आहे असे दिसते. म्हणून खुलासा झाल्यास बरे होईल. हल्ली मी महार लोकाना शिकविण्यास जात असतो. परवा मिरव- णुकीच्या वेळी आपण विलिंग्डन कॉलेजसंबंधी चौकशी केली त्यावरून प्रिन्सिपाल भाटे यानी परवा म्हटल्याप्रमाणे सोसायटीचा नाश करावा असे आपल्या मनात नाही याची खात्री पटते. " (२३) पी. एस. अय्यर यांचे टिळकाना पत्र माल व्हर्न (दक्षिण आफ्रिका ) २४ फेब्रुवारी १९२० पत्र आपणाला दक्षिण आफ्रिकेतील हकीगतीची माहिती व्हावी म्हणून पाठवीत आहे. तिकडील लोकाना इकडील खरी माहिती फार थोडी असते. व्हाइसरॉयानी एक कमिशन नेमले एवढ्यावर तिकडील लोकानी खूष होऊ नये. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांची परिषद भरली होती. पण गांधी यानी तिला