पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ लो० टिळकांचे चरित्र ( १७ ) काळेश्वरराव यांचे टिळकाना पल भाग ६ बेझवाडा १६ फेब्रुवारी १९२० आंध्र देशाचे पुढारी ना. कोंडा वेकटप्पया गारू यानी आपणाला आंध्र देशाला भेट देण्याविषयी विनंती केलीच आहे. आणि आपण केव्हा याल या विषयी आम्ही उत्सुकतेने वाट पहात आहो. इतर कोणत्याहि प्रांताप्रमाणे आंध्रामध्ये राष्ट्रीय भावना उदित झालेली आहे. तरी आपण येऊन आम्हाला योग्य तो उपदेश कराल व आशीर्वाद द्याल अशी आशा आहे. आपण आल्याने या राष्ट्रीय बुद्धीला अधिक जोर येणार आहे. आपला इकडील कार्यक्रम कसा ठरवावा या विषयी आपण मला किंवा कोंडा वेंकट अप्पया याना लिहिल्यास बरे होईल. (१८) दादासाहेब खापर्डे यांचे टिळकाना पत्र दिल्ली १६ फेब्रुवारी १९२० तुमचे पत्र पावले. लजपतराय याना भेटण्याकरता येता येत नाही. तरी तुम्ही आणि ते मिळून दिल्लीस २६ व २९ या तारखांच्या दरम्यान यावे. येथे आल्यास पंडितजींच्या विचारे विलायतेस पुन्हा शिष्टमंडळ पाठवून नियमासंब- धाने आपले म्हणणे कमिटीपुढे मांडण्याविषयी काय करावे याचा विचार करिता येईल. सनातन धर्म सभा त्याचवेळी येथे भरणार आहे. तरी येता आल्यास एका फेरीत दोन कामे होतील. ( १९ ) श्रीश्चंद्र दत्त यांचे टिळकांना पत्र करीमगंज (आसाम) १६ फेब्रुवारी १९२० अमृतसर येथील ठराव आम्ही वाचले. परंतु ते लोकाना नीट समजून सांगितल्याशिवाय त्यांचे मर्म त्याना कळणार नाही. मतदारावर जबाबदारी फार टाकली आहे. व स्वार्थसाधु लोक आतून आतून पुष्कळशी जागा पोखरणार. ..म्हणून खरे व प्रबल लोकमत तयार होण्याची खटपट झाली पाहिजे. आम्ही तारिख ५-६ मार्च रोजी प्रांतिक परिषद भरवीत आहो. आपल्यासारखे पुढारी इकडे आल्यास फारच मदत होईल. काही प्रश्न स्थानिक स्वरूपाचे निघतील. हे खरे. तथापि त्यांच्या बरोबर सुधारणांचा प्रश्नहि निघेल, तरी सर्वच बाबतीत आम्हाला आपला सल्ला पाहिजे. सामान्य लोक देखील आम्हाला विचारतात की इकडे टिळक येणार नाहीत काय ? आपण होय असे नुसते कळविले की बाकी सर्व व्यवस्था मी करतो. ( २० ) विरुमल बेगराज यांचे टिळकाना पस सक्कर (सिंध) १७ फेब्रुवारी १९२० आपण इकडे येणार हे ऐकून लहान थोर मुले मुली सुद्धा टिळक आप- णाला पाहावयास मिळणार म्हणून अतिशय आनंदित झाली आहेत. सक्कर