पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ७८ जबाबदार राहिला पाहिजे. नवीन सुधारणांचा कायदा झाला त्याच्या योगाने घटनात्मक राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग खुला झाला असून त्या वाटेने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा पुढेमागे सफल होण्याचा संभव आहे. या कायद्याअन्वये पुष्कळ काम करिता येण्यासारखे आहे व हे करिता करिता स्वराज्याचे शिक्षण लोकाना पुष्कळ मिळेल. सुधार- णांचे त्यामागून हप्ते मिळविता येतील या दृष्टीने पाहता हिंदुस्थानात एका नवीन युगाला प्रारंभ झालेला आहे व त्याच्या आड आम्ही येणार नाही किंवा आड येण्यासारखे कोणतेहि कृत्य करणार नाही. किंबहुना हरप्रयत्नाने ते यशस्वी होईल असे करू. आपल्या सरहद्दीवर भानगडी सुरू आहेत आणि पिढ्यान् पिढ्या ज्या परकी लोकांच्या स्वारीचा धाक हिंदुस्थानाला बाळगावा लागला तोहि अजून तसाच आहे. म्हणून आम्हा दोघाहि बंधूंना प्रामाणिकपणाने असे वाटते की इंग्लंड व हिंदुस्थान यानी परस्परांवर स्नेही व दोस्त म्हणून विश्वास टाकून बसावे. मात्र हिंदुस्थानला तोंड मिटून दुसऱ्याच्या हाती दोरी असलेल्या गुलामासारखे राबावे लागू नये. परिस्थितीप्रमाणे साधनेहि बदलतात. म्हणून नवीन विधायक व संघटनात्मक युग आमच्यापुरते यशस्वी करण्याचा आम्ही शक्य तो प्रयत्न करू असे सांगतो. व आमचे टीकाकार किंवा आमचे मित्र यानी आमच्या या शब्दावर विश्वास ठेवावा. (१५) वैनम्पूर यांचे टिळकाना पत्र- लंडन १२ फेब्रुवारी १९२० अमृतसर राष्ट्रीय सभेची हकीकत लिहिलीत ती कळली. पंजाबात अनेक गोष्टी दुःखद घडल्या. पुढे लोक आशेने पाहात आहेत ही बरी गोष्ट आहे. कमि- टीचे काम पुन्हा केव्हा सुरू होईल हे कळताच तुम्हाला मी लिहितो. कारण काँग्रेसच्या तर्फे कमिटीच्यापुढे साक्ष देण्याची खटपट ताबडतोब झाली पाहिजे. (१६) क. वेजवूड यांचे टिळकाना पव स्टोक ऑन ट्रेंट १४ फेब्रुवारी १९२० तुमचे पत्र व त्याबरोबर आलेले कागद पोचले. तुम्ही पाठवलेला गुप्त पोलिस खात्याचा रिपोर्ट येथे प्रसिद्ध करण्याची तजवीज पाहतो. पण त्याविषयी स्पूर व मी हे आधी एकदा बोलणार आहोत. लजपतराय हे इकडून जात आहेत ते सगळी ताजी हकीकत सांगतील. जनरल डायर यांच्या संबंधाने पार्लमेंटात वाद विवाद झाला तेव्हा बरीच कडक भाषणे झाली. मी पुढल्या नोव्हेंबरमध्ये हिंदुस्था- नास येत आहे.