पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ हिंदुस्थानासंबंधी कितीतरी काम होण्यासारखे आहे. मी आपल्याकडून होईल ती मदत करीन. मी परत जाताच लॉइड जॉर्ज व माँटेग्यू याना भेटतो. हिंदुस्था- नातील हकीकत मधून मधून कळवीत जा. तुमच्याकडून येणाऱ्या पत्राना मी फार चाहतो. (१३) केळकर यांचे पंडित नेहरू यांस पल पुणे १९ जानेवारी १९२० गेल्या राष्ट्रीय सभेने लंडन येथील इंडिया पत्त्रासंबंधाने ठराव केला त्याची अंमलबजावणी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आपण त्वरित कराल तर बरे होईल. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या पत्राची सुधारणा कशी करावी या संबंधाने पूर्वीच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे रिपोर्ट केला आहे. ता. १२ जानेवारी रोजी भरलेल्या सभेत त्याचा विचार करण्याला सवड झाली नाही व फिरून सभा लव- कर बोलावली जाईल असे दिसत नाही. म्हणून लेखी अभिप्राय मागवून या गोष्ठीचा विचार करावा असे मला वाटते. ही सुधारणा घडून येण्याला प्रथम सुमारे ७५० पौंड पाठविले पाहिजेत. तसेच त्या रिपोटीत सुचविल्याप्रमाणे आपण इंडिया पत्राचा संपादक होऊन जाण्यास तयार असलेल्या लोकांची नावे व शिफा- रसी प्रत्येक प्रांताकडून मागवाव्या व त्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभा- सदाकडे लवकर पाठवाव्या असे मला वाटते. (१४) गणेश दामोदर सावरकर यांचे पत्र ८ फेब्रुवारी १९२० आम्ही वेळोवेळी पाठविलेल्या पत्रातून नवीन सुधारणांविषयी आमची मते प्रकट करीत आलोच आहो. ती वाचल्यावर आमच्या सुटकेला सरकारला काही प्रामाणिकपणाची हरकत घेण्याचे कारण नाही इतकी ती स्पष्ट आहे. पण पुन्हा एकवार ती मते या पत्राने स्पष्ट सांगतो. साम्राज्यांतर्गत स्वराज्य हे ध्येय आम्हाला तिटकारा येण्यासारखे वाटत नाही. इतकेच नाही तर आमचे अजूनहि राष्ट्रीय आकांक्षेचे ध्येय आहे. फार काय पण विश्वबंधुत्व असावे असे आम्हाला वाटते. सर्व पृथ्वी हे एकच राष्ट्र व त्यातील सर्व स्त्री पुरुष ही एकाच घरची भावंडे आणि या सृष्टीचे सर्व पदार्थ व फायदे सर्वानाच समान हक्काने मिळावे असे आमचे मत आहे. इतर कोणतीहि घटना कृत्रिमच होय. आज राष्ट्रासंबंधाने ध्येय मर्यादित ठेवावे लागते त्याला इलाज नाही. म्हणून इंग्लंड व हिंदुस्थान यांचे परस्परसंबंध दिवसेदिवस अधिक सुदृढ व्हावे आणि कोणाहि एकाचा दुसऱ्यावर ताबा न चालता दोघांचीहि उन्नति व्हावी याकरिता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मात्र साम्राज्यातील प्रत्येक अवयव स्वयंनिर्णयाचा अधिकारी झाला पाहिजे. आणि आपला आपल्याला