पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ७६ दास हिरेंद्र दत्त फजलुल हक आणि मी बसून आम्ही विचार केला. रौलेट अॅक्टा- विरुद्ध चळवळ करावयाची तर तो विवक्षित कायदा मोडावा आणि विलायती मालावर बहिष्कार पुकारावा आणि प्राप्तीवरील कर देऊ नये असे आम्ही ठरविले. पण एकवार फिरून बसून पक्के ठरविणार आहो. दास व हिरेंद्र बाबू याना पहिल्या दोन गोष्टींचे महत्त्व विशेष वाटते. पण पहिली टाकून दुसरी व तिसरी अंमलात आणली तर चळवळ अधिक वेळ चालेल. आम्हा पाच सहा लोकाना सरकारने अटकेत ठेवले तर चळवळीचे एक प्रकारे कार्यच झाले ! (१०) केळकरांचे ए. रंगस्वामी याना पत्र. पुणे १४ एप्रिल १९१९ नागपूरचे ना. शुक्ल यानी आपण विलायतेस जाऊ शकत नाही असे कळविले आहे. तरी त्यांचे जागी मी तुमचे नाव सुचविणार आहे. ते सुचवू का ? तुमची निवडणूक झाल्यास सत्याग्रहाच्या शपथेने तुमच्या मार्गात काही व्यत्यय येईल असे मला वाटत नाही. तुम्ही म्हणाल तितके दिवस बाबासाहेब परांजपे यानी तिकडे रहावे असे मी त्याना लिहीत आहे. (११) केळकर यांचे पंडित मदनमोहन याना पत्र. मुंबई २१ एप्रिल १९१९ मला खरोखरच एक तक्रार केली पाहिजे. ती अशी की शिष्टमंडळे नक्की ठरविण्याचा दिवस तुम्हाला विचारूनच मी ठरविला. आणि त्याकरिता मी मुंत्र- ईस दोन दिवस आगाऊ येऊनद्दि राहिलो. असे असता आपण ही महत्त्वाची कमिटीची सभा टाकून देऊन गांधी याना भेटण्यास जात आहात. या कमि टीच्या कामाला देण्याला आपणाला पाच मिनिटेहि मिळाली नाहीत याचे आश्चर्य वाटते. आपण या कमिटीचे अध्यक्ष आहात तरी यामुळे काही बिघडले तर सर्व जबाबदारी आपणाकडे आहे असे मी आपणाला कळवितो. काँग्रेस-डेप्युटेशन- मध्ये काही जागा रिकाम्या पडल्या तर त्या भरण्याला आपणाजवळ माणसे आहेत व कमिटीला त्या भरण्याचा अधिकारहि आहे. तेव्हा ही बाब ऑल- इंडिया काँग्रेस कमिटीपुढे जाण्याचे कारण नाही. तथापि आपल्याला योग्य वाटल्यास ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची तारीख ठरवा. माझी त्यालाहि हर- कत नाही. ( १२ ) हॉलफर्ड नाइट यांचे केळकराना पत्र कॅलिडोनिया आगबोट १२ जानेवारी १९२० तुम्ही पाठविलेले पार्सल मला आताच आगबोटीवर मिळाले. तुम्ही पाठ- विलेल्या वस्तू पुण्याचे स्मरण म्हणून आम्ही घरी घालीत जाऊ. विलायते मध्ये