पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५ लो० टिळकांचे चरित्र मार्ग ६ कळवा असे लोक विचारतात. रौलेट कमिटीच्या रिपोर्टाविरुद्ध रोज काही तरी चळवळ केल्याशिवाय माझा इल्ली एकहि दिवस जात नाही. यावेळी सर्व राष्ट्रीय- पक्ष एकविचाराचा होईल तर किती बरे होईल ! (६) खापर्डे यांचे केळकराना पत्र दिल्ली २५ जानेवारी १९१९ बाईचे शिष्टमंडळ काँग्रेसवर आघाडी मारण्याच्या तयारीत दिसते. पण एप्रिलच्या पूर्वी फ्रेंन्चाईज कमिटीचा रिपोर्ट तयार होणार नाही, तो झाल्या- वर एप्रिलच्यापुढे शिष्टमंडळाना पासपोर्ट देतील असे वाटते. (७) अॅड० मुनशी यांचे केळकराना पत्र मुंबई ८ फेब्रुअरी १९१९ झवाई व जिना यांच्याशी आमचा फार वाद झाला. व कडाक्याचाहि झाला. पण ती दोघे आपला हट्ट सोडीत नाहीत यामुळे राष्ट्रीय सभेच्या शिष्ट- मंडळावर त्यांची नेमणूक करून फुकट. मालवीयजी आपल्याकडून खटपट करीत आहेत पण ते जुळणे कठीण दिसते. 'राष्ट्रीय सभेचा ठराव ऑ. ई. काँ. कमिटी दुरुस्त करील तर मी राष्ट्रीय सभेच्या शिष्टमंडळात जाण्यास तयार आहे असे मी केळकराना पूर्वी सांगितले आहे व ते माझे मत तसेच कायम आहे असे केळकराना लिहा ' असे जिना यानी मला सांगितले. पार्लमेंटकडे अर्ज करण्या- विषयी टिपण मी तुमचेकडे पाठविले आहे ते वाचून तपासून व दुरुस्त करून माझ्याकडे परत पाठवा. (८) अॅड० मुनशी यांचे केळकराना पत मुंबई १९ फेब्रुअरी १९१९ येथील होमरूल लीगचे शिष्टमंडळ विलायतेस जाणार की नाही म्हणून तुम्ही विचारता तर माझी माहिती अशी की 'शहाण्या लोकानी ' सल्ला दिल्या- मुळे राष्ट्रीय सभेच्या शिष्टमंडळाशिवाय दुसरे कोणचेहि जात नाही ! पटेल मला लिहितात की ' पार्लमेंटकडे अर्ज म्हणून जो करावयाचे ठरले आहे त्याची व्यवस्था केळकर व तुम्ही मिळून करावी. ' (९) इंदुभूषणसेन यांचे केळकराना पत्र कलकत्ता २२ मार्च १९१९ व्योमकेश चक्रवर्ती याना तुम्ही मुंबईस बोलाविले पण ते आताच येऊ शकत नाहीत. टिळक अपील करणार असे काही वर्तमानपत्रात वाचले. पण त्याचा काही उपयोग होईल असे तुम्हास वाटते काय ? ता. १९ रोजी चक्रवर्ती-