पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ १९१९ व २० सालामधील निवडक पत्रे ७४ रिता राष्ट्रीय सभेची जादा बैठक भरवावी. त्याना असेहि वाटते की या गोष्टीला पुणे हे चांगले ठिकाण आहे. आपणाला आता गप्प बसून उपयोगी नाही. पुढील खटपट केलीच पाहिजे. ( ४ ) बेझंटबाईंचे केळकराना पत्र मद्रास २४ जानेवारी १९१९ राष्ट्रीय सभेच्या शिष्टमंडळात जाऊन मग तिची आज्ञा मोडून सुधारणांचे बिल कोणी सुधारावे हे मला योग्य वाटत नाही. काँग्रेसच्या शिष्टमंडळात जाणे मला फार बरे वाटले असते. पण असे हात बांधून घेऊन जाणे मला योग्य वाटत नाही. महत्त्वाच्या मुद्यावर राष्ट्रीय सभेची आज्ञा मानावी हे ठीक. पण किरकोळ गोष्टीत देखील कोणी स्वतंत्र मत सांगू नये हे काय ? आज एकदम प्रांतिक स्वातंत्र्य मागावे असे राष्ट्रीय सभेत बहुमताने ठरले आहे व ती मांगणी 'मुद्याची महत्त्वाची व न सोडण्याची' या सदरात घातली आहे. शिवाय माझ्याविषयी अनेक लोकांचा विद्वेष कसा आहे हे पहा. म्हणून मी काँग्रेसच्या शिष्टमंडळात राहणे योग्य नाही. एकंदर थाट असा की जे कोणी मोठमोठ्याने शिरा ताणून बोलतील त्यांचेच • झणणे ग्राह्य! आणि कोणी परिस्थितीचा विचार केला खऱ्या अडचणी काय आहेत त्या लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे मागणीला मुरड घालण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यावर लोक रागावून तुटून पडतात. समेट करण्याला मी तयार आहे. पण अविचाराने सगळे हातचे गमावणान्या जहालाबरोबर काम करण्यापेक्षा, ज्याचा उद्या अधिक काही मिळविण्याकडे उपयोग करता येईल असे थोडे तरी मिळवू पाहणान्या नेमस्ताशीच सहकारिता करावी हे मला अधिक पसंत आहे. दिलेले टाकू नये अशा मताची मी प्रथमपासून आहे. मी काही टाकणार नाही. घेईन ते स्वीकारले असेहि म्हणणार नाही. मिळेल त्याची जबाबदारी पत्करणार नाही. पण लोकांचा हा अविचारी विरोध पाहून थोडे हि स्वीकारावे असा माझा कल होऊ लागला आहे. जे थोडेहि देऊ नका असे आमचे शत्रु म्हणतात त्यात स्वीकारण्यासारखे काही तरी असलेच पाहिजे असे मन सांगते ! (५) विजयराघवाचारियर यांचे केळकराना पत्र सेलम २५ जानेवारी १९१९ तुम्हाकडून आपले ठरल्याप्रमाणे पत्रे आली म्हणजे मी या इलाख्यातील लोकाना ती पाठवितो आणि ते विलायतेस जातात की नाही व गेले तर त्यांचा खर्च ते करणार की नाही याची माहिती मिळवितो. शिष्टमंडळाच्या सभेला दिल्लीस मी जाण्याचे काही कारण आहे असे वाटत नाही. कारण पुष्कळशा लोकांची मला माहिती नाही. या प्रांताकरिता किती संख्या निश्चित झाली हे टि० उ... ३६