पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९१५ सालांतील निवडक पत्रे ३९ टिळकांचे उत्तर हल्लीच्या प्रसंगाकरितां म्हणूनच सरकार म्हणत असेल तर मी यंदा मिरवणुकीत जाणार नाही. पण तेहि विशेष परिस्थिति आहे म्हणता म्हणून. पण हे यंदा पुरतेच असे निश्चित समजा. पुढे ते माझ्यावर बंधनकारक नाही. (७) कॅ० बसू यांचे केळकराना पत्र अलाहाबाद ७ ऑक्टोबर १९१४ टिळकांची प्रकृति बरी आहे असे वाचून आनंद झाला. पुढील पत्रात त्याना माझे नमस्कार लिहा. त्यांचे 'ओरायन' व 'वेदकालीन आर्यवस्ती या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या केव्हा निघणार आहेत ? Sacred Books of १ the Hindoo's' या नावाची एक ग्रंथमाला आली काढण्याचा विचार केला आहे. तरी तीत हे दोन ग्रंथ घेता आले तर मला फार बरे वाटेल. तुम्ही अला- हावादेस का येत नाही ? 'हिंदी वाङ्मय इयर बुक' काढण्याच्या बाबतीत तुह्मी मदत केली त्याबद्दल फार आभारी आहे. (८) बी. टी. अंकलेसरीया यांचे टिळकाना पत्र मुंबई ता. २६ आक्टोबर १९१४ अवेस्ता ग्रंथातील दोन नावे ' आरोनावा आणि सावरिहा' या शब्दावर मी एक लेख लिहित आहे. उत्तर दिशेकडील दोन नक्षत्रपुंज ज्यांना ॲन्ड्रोमीडा व कॅसिओपियस असें म्हणतात त्यांचीच ही नावे असावीत असा माझा तर्क आहे. तरी वैदिक वाङ्मयात किंवा वैदिकोत्तर वाङ्मयात खालील नक्षत्राना काही प्रति नावे आढळतात की काय कृपा करून कळवा. ती नक्षत्रे ही:- १ सेफियस २ अॅन्ड्रोमिडा ३ कॅसिओपिया ४ पर्सियस् ५ पिगॅसस् ६ सीटस्, माझ्यामतें वैदिक तृतआन्त्य ज्याला आवेस्तामध्ये येतानो आथ्वयानॉइस असे म्हणतात तेच पर्सियस् असावे. सीटस् म्हणजेच वैदिक अहिमृत्र व आवेस्तांतील अझिदहाक. कॅसिओपिया हीच अरुंधती. तेच आवेस्तांतील सावरीहा. किफियस हेच वैदिक यमवैवस्वत इ. इ. माझा लेख तयार झाला म्हणजे तुमचेकडे तो पाठवीन. मुंबईत काही संस्कृत पंडिताना ही माहिती मी विचारली पण त्यांच्याकडून ती मिळाली नाही म्हणून तुम्हाला तसदी दिली आहे. (९) साने यांचे केळकाराना पत्र बार्शी १५ नोव्हेंबर १९१४. नगरास चितळे याना साताऱ्यास नेमलेल्या कमिटीचे काम पुढे ढकलावे अशाविषयी मी लिहिले आहे. ही कमिटी अद्याप काही प्रकाशाने दोष दिला आहे. तो आपण का घ्यावा ? ना. करीत नाही असा इंदु- गोखले आतां पुण्यास