पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ आगष्ट रोजी ( रविवार मिति आषाढ वद्य ९ ) त्रिवेणी संगमात विधिपूर्वक त्यांचे विसर्जन करण्यात आले. अशा रीतीने टिळकांचे लौकिक चरित्र संपले. देह मातीला मिळाला. आत्मा स्वस्थानी गेला. आणि टिळकांच्या स्मर- णाने हिंदी जनतेच्या मनोमंदिरात कायमची वसती केली ! परिशिष्ट [ सन १९१९-२० सालातील निवडक पत्रे. ] (१) सत्यमूर्तीचे केळकरास पत्र मद्रास ११ जानेवारी १९१९ बेझेन्टाईनी काय चालविले आहे हे तुम्ही पाहताच. पण राष्ट्रीय सभेचे मत काय आहे हे इंग्लंडला नीट कळावे अशी खबरदारी आपण घेतली पाहिजे. बेझन्टबाई व रामस्वामी अय्यर यांचे आपसात ठरल्यावरून रामस्वामी मला म्हणाले की काँग्रेसतर्फे शांतता परिषदेकडे जे शिष्टमंडळ पाठवावयाचे त्यात टिळ- कांची नेमणूक करणे हिताचे नाही. यावरून काय ते समजा. वर्तमानपत्रात या विषयी गवगवा केला पाहिजे. पार्लमेंटकडील अर्ज तयार झाला असल्यास त्याची रूपरेखा मला कळवा. काँग्रेसचे शिष्टमंडळ होमरूलच्या शिष्टमंडळाच्या आधी गेले पाहिजे. (२) अॅडव्होकेट मुनशी यांचे केळकराना पत्र मुंबई १७ जानेवारी १९१९. आपण जो अर्ज तयार करणार आहो त्याकरिता मी पूर्वीचे दाखले काही मिळाले तर पाहात आहे. अर्जाची टिपणे प्रथम करून मी यासोबत तुमच्याकडे पाठवीत आहे. तरी ती पाहून परत करावी. अर्ज मोघम काँग्रेसच्या नावाने लिहावा किंवा जे कोणी त्यावर प्रत्यक्ष सह्या करतील त्यांच्या नावाचा लिहावा याचा दाखला मी पाहात आहे. (३) विजयराघवाचार्य यांचे केळकरांना पत्र सेलम २० जानेवारी १९१९ कस्तुररिंग अय्यंगार व मद्रासचे इतर काही की राजकीय सुधारणांचे बिल लोकापुढे आले म्हणजे स्नेही यांचे मत असे आहे त्याचा विचार करण्याक-