पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अस्थींचा पुण्यनगरप्रवेश समारंभ ७२ सर्व वाटभर अस्थींचा सत्कार सुरू होता. ठिकठिकाणी फुलांचे हार सम- र्पण करण्यात येत होते. स्टेशन ते गायकवाडवाडा या दोन मैल लांबीच्या हद्दी- तील प्रत्येक घराची प्रत्येक खिडकी व दरवाजा स्त्रीपुरुषानी, विशेषतः स्त्रियानी ठेचून भरला होता. रस्त्याप्रमाणे सज्जावर पत्र्याच्या छपरावर माणसाला माणूस भिडले होते. स्त्रिया प्रायः पालखीसमोरून जाताना भाविकपणाने नमस्कार करीत. काही वरून फुलेहि फेकीत. कित्येक स्त्रिया डोळ्याचे पाणी पदराने पुशीत होत्या. दिंड्यांचे टाळकरी एकसारखे भजन करीत होते. नुसता 'रामकृष्णहरि ' किंवा 'ज्ञानदेव तुकाराम' हा पाठ चालू असे तोपर्यंत ते झराझर पाऊल उचलीत. पण अभंगास सुरुवात झाली की, तो संपेपर्यंत मुक्कामच पडावा व मागील गर्दी येऊन अंगाशी भिडून रेटारेटी व्हावी असे सुरू होते. मिरवणुकीतील पुढारीपणा सर्वस्वी भजनी मंडळीकडे होता. पाऊल सावकाश अगर जलद उचलावे अगर मुक्काम व्हावा हा सर्व त्यांचा अधिकार. भजनाच्या शब्दात सर्व प्रकारचे जयजयकार मिसळून दुमदुमत होते. सर्व नवेजुने साधु सर्व नवेजुने राष्ट्रभक्त वंदेमातरम्सारखे जयशब्द आणि खुद्द टिळकांची नावे व पदव्या यांची पदपरिवर्तने यापैकी एकनाएक उच्चारल्याशिवाय एक क्षणहि जात नव्हता. नाही म्हणावयाला 'दारूवाला पुलाच्या मशिदीसमोर भजनी वाद्ये बंद करण्यात आली आणि 'हिंदुमुसलमान की जय' असा एकच जयघोष करण्यात आला. अशा गर्दीचे समारंभ खुद्द टिळकांच्या संबंधानेच पूर्वी एकदोन वेळा पुण्यात पाहावयास सापडले होते. पण आजची गर्दी विशेष भासली. मधून जाण्यायेण्याला रीघ नव्हती. पावलामागे पाऊल लागल्यामुळे आपल्या टाचेलाच चौडे उलटी फुटली आहेत की काय असे वाटे. 'मुंगीच्या पायाने चालणे ' ही म्हण माणसानी आपल्या चालीने खरी करून दाखविली. चार वेळा पावसाने रस्ता भिजला व चार वेळ ताब- डतोब मनुष्यांच्या पावलानी तो कोरडा केला गेला. पुढच्या पायानी चिखल तुडवून मागच्या पायाकरिता पायघडी एकसारखी तयार होत होती. आजचा समारंभ मृताचा सन्मान करण्याचा असल्यामुळे सर्व लोक बोडके व अनवाणी चालले होते. या दृष्टीने आजचा मेळा काही चमत्कारिक दिसत होता. अस्थिरथ पुणे स्टेशनावरून गायकवाड - वाड्यात पोचण्यास सुमारे पाच तास लागले. वाड्यात गर्दी इतकी झाली की पाय ठेवण्यास जागा नव्हती. खुद्द अस्थिकरंडक नेण्यालाहि बाव मिळेना. शेवटी आडबाजूने कसा तरी तो एका माडीवरून दुसऱ्या माडीवर नेण्यात आला. शेवटचे दर्शन म्हणून लोक जिन्याच्या कठड्यावरून व ग्यालरीच्या खांबावरून तसेच एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून चढू लागले. शेवटी लोक- मान्य ज्या ग्यालरीत खुर्ची टाकून नेहमी बसत तेथे उभे राहून उंच हात करून अस्थि - करंडकाचे दर्शन दिल्यावर सर्वांनी नमस्कार करून निरोप घेतला. पुण्यातील और्ध्वदेहिक कृत्य संपल्यावर टिळकांचे वडील चिरंजीव व कनिष्ठ जामात हे श्रीक्षेत्र प्रयाग येथे टिळकांच्या अस्थि घेऊन गेले व ता. ८