पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ लो. टिळकांचे चरित्र भाग ६ ते आपल्या पायानी गेले. येताना ते एका वीतभर लांबीच्या चंदनी पेटीत निजून आपल्या परिचरांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता. येताना त्या सर्व व्यापांचा त्याग त्यानी केला होता. जाताना ते वासनापूर्ण होते. येताना त्यानी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकाविषयी बोलत होते. येताना त्यानी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीका- रले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाताना त्यानी. टिळक पूर्ण असे पुणे सोडले. येताना त्यानी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला. टिळकांच्या अस्थींचा नगरप्रेवशसमारभ मंगळवार ता० ३ रोजी सकाळी झाला. मुंबई येथील स्मशानयात्रा आटपल्यावर त्याना संदेह पुण्यास आणण्याची पुणे- करांची आशा अर्थात् दग्ध झाली. पण त्यांच्या देहाची राख मुंबईस पडली तरी त्यांचा अस्थिदेह पुण्यास आणण्यासारखा होता. म्हणून निदान तो तरी सत्कार- समारंभाने आणावा असे पुणेकरानी ठरविले. त्याप्रमाणे रात्री ३ वाजता अस्थि घेऊन मंडळी स्पेशल गाडीत बसून निघाली. ही स्पेशल ट्रेनची व्यवस्था पुण्यातील समारंभाच्या व्यवस्थापकास माहीत नव्हती ती दुसरे दिवशी सकाळी त्याना स्टेशनवर समजली. दरम्यान ७ || ला गाडी येणार या अदमासाने मंडळी जमू लागली. स्पेशलगाडी 'साइडिंग' ला येताच सर्व मंडळीनी टिळकांच्या नावाचा जयघोष करून अस्थीना सलामी दिली. अस्थि लहानशा चंदनी नक्षीदार पेटीत घातलेल्या असून फुलांच्या माळानी ही पेटी चेष्टिली होती. साईडिंगपासून थोड्या अंतरावर एका मोठ्या चारचाकी रथा- वर पालखी ठेवली होती तीत ही पेटी ठेवण्यात आली. रथाला खांदे देऊन स्वयंसेवक मंडळी तो ओढीत होती. रथावर चढून पालखीमागे उभे राहून लोक- मान्यांचे दोघे चिरंजीव पालखीवर चवऱ्या वारू लागले. पालखीवर उंच काठीची मोठी रेशमी डेरेदार छत्री उभी केलेली होती. दोहो बाजूस सुगंधी उदबत्त्यांचे गुच्छ धुपत होते. रथाचे मागेपुढे रंगण करून त्यात प्रमुख मंडळींना घेण्यांत आले होते. स्थामागोमाग काही स्त्रिया चालत होत्या. रथापुढे रंगणापलीकडे भजनी दिंड्या रांगेने उभ्या असून त्यांचे टाळ व मृदंग सारखे तालावर वाजत होते. अशा थाटाने ही मिरवणूक सुमारे ९ वाजण्याचे आधी स्टेशनच्या पश्चि- मटोकापासून निघाली ती संथपणे चालत असून इस्पितळाजवळ येण्यासच ९ ।। झाले. मिरवणूक जसजशी पुढे जाऊ लागली तसतशी माणसांची गर्दीहि अधिक होऊ लागली, यामुळे उशीर होतो असे वाटले तरी पाऊल मात्र जलद पडेना. रास्त्यांचे वाड्यापाशी येण्यालाच १०|| झाले, रविवार गाठण्यास १२ झाले, बुध- वारात येण्यास पाऊण वाजला. आणि पालखी गायकवाडवाड्यात शिरून अस्थि- करंडक टिळकांच्या माडीवर नेऊन ठेवून मंडळी परत फिरण्यास १॥ वाजून गेला.