पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अस्थींचा पुण्यनगर प्रवेश-समारंभ णार नाही अशी कबूली लोकानी आधी दिली पाहिजे." अर्थात् ही कबूली देऊन परवानगी मिळवावी लागली व ती मिळाली. आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे भर- वस्तीच्या भागातून किंचित् लांबच्या मार्गाने स्मशानयात्रा काढण्याचा मार्ग पोलिस कमिशनर यानी ठरवून दिला. रविवारी सकाळी शहरात बातमी कळल्यापासून कामधाम बंद झाले. आणि रीतीप्रमाणे बाजार व दुकाने उघडावयाची ती कोणी उघडलीच नाहीत. सरकारी हुकुमाने सुटी दिली गेली नव्हती यामुळे कचेन्या उघड्या राहणार होत्या. तथापि त्या दिवशी कोण केव्हा आला गेला याची वरिष्ठानी फारशी चौकशी करू नये असा न सांगता संकेत झाल्यामुळे कचे-यातील लोकहि कोणी परवानगी विचारून कोणी तसेच मधून मधून आपापल्या सवडीप्रमाणे स्मशान- यात्रेत येऊन टिळकांचे दर्शन घेऊन गेले. सुमारे दीड दोन वाजता स्मशान- यात्रेला सुरवात झाली. प्रेतासनाला खांदा देऊन टिळकाविषयी आदरबुद्धीने आपले शेवटचे कार्य करावे या हेतूने अनेक प्रमुख लोकानी एकामागून एक खांदे दिले. त्यात कोणी जात किंवा धर्म पाहिला नाही. मुसलमानपुढाऱ्यानीहि मधून मधून खांदे दिले. यात्रेला गर्दी इतकी जमली की कोणत्याहि एका रस्त्यात ती मावणे शक्य नसल्याने व यात्रा कोणत्या मार्गाने जाणार हे आधी कळल्याने लोक कोठे तरी उभे राहून का होईना पण सोने दर्शन घडावे म्हणून पुढच्या रस्त्याला आधी जाऊन जागा धरून उभे राहिले. अशा रीतीने प्रेतासन व त्या भोवतालचे हजार पाचशे मनुष्य हे चालत होते तरी ठिकठिकाणी गर्दी थबकून उभीच असल्याने लोकयात्रा एकंदरीने चल म्हणण्यापेक्षा स्थिरच अधिक म्हणावी लागली. त्या दिवशी पाऊस मधून मधून फार जोराचा पडत होता. तथापि त्याची पर्वा कोणीहि केली नाही. व अंगावरचे कपडे भिजल्याची कोणास आठवणहि झाली नाही. ज्या रस्त्यानी यात्रा गेली त्यातील खालचे वरचे मजले व ग्यालऱ्या स्त्रीपुरुषानी भरून गेल्या होत्या. दिंड्यांचे अखंड भजन सुरू होते व मधून मधून शवासनावर पुष्पवृष्टि होत असे. अशा रीतीने यात्रा चौपटीवर पोचल्यानंतर गर्दी जागच्याजागी उभी राहून तिच्या घेरामध्ये लहानशी जागा मोकळी ठेवून तीत चंदनकाष्ठांचे सरण रचण्यात आले. आणि काही थोर लोकांची समयोचित अशी लहानशी भाषणे झाल्यावर अभिसंस्कार करण्यात आला. ( २० ) अस्थींचा पुण्यनगर-प्रवेश-समारंभ लो. टिळक ता. १२ जुलै रोजी मुंबईस जाण्याकरिता गायकवाडवाड्यातून बाहेर पडले ते मुंबईहून गायकवाडवाड्यात ता. ३ आगस्ट रोजी परत आले! पण या दोन प्रसंगात केवढे तरी अंतर ! जाताना ते आपल्या साडेतीन हात देहानिशी बाहेर पडले. येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यानी अंगात नेहमींचा पोषाख घातला होता. येताना त्यानी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना