पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ व तेथे ओंकारेश्वरी त्यांचा अत्यंविधि करावा. पण कोणी किती घाई केली तरी मुंबईला पोचण्याला पाच तासांचा प्रवास करावाच लागणार. आणि पुणेकरांची संमति घ्यावयाची म्हटले तरी मुंबईच्या लोकाना स्मशानयात्रेचा निश्चय इतका वेळ न करता थांबणे शक्यच नव्हते. दुसरीहि एक गोष्ट अशी होती की जेथे देहावसान झाले तेथेच स्मशानयात्राहि होणे हेच योग्य. यात अभिमानाचा प्रश्न फारसा नव्हता. गोष्ट अगदी सरळ होती. तथापि अभिमानच धरावयाचा तर पुण्याप्रमाणे मुंबईनेहि तो का न धरावा ? पुणेकरानी आग्रह धरला तरी मुंबईचे लाखो लोक तो कसा चालू देतील ? तरी पण पुण्याची मंडळी आल्यावर स्मशान- यात्रेची सर्व सिद्धता झाल्यानंतरहि पुण्याच्या प्रेमाखातर काही पुणेकर मंडळीनी हा प्रश्न काढलाच. व प्रेमाच्या उद्वेगाने त्यातील काही लोक वर्दळीवरहि आले. पण जी गोष्ट सरळ ती सरळच. म्हणून अशांचेहि योग्य समाधान होऊन स्मशान- यात्रा मुंबईसच करावयाची असे ठरले. सकाळपासून लोकांच्या झुंडींच्या झुंडी येत होत्या. त्याना स्मशानयात्रेची वेळ ठरलेली कळविण्यात आली. तथापि आल्यासारखे दर्शन घेऊन जावे अशी त्यांची इच्छा यामुळे सकाळीच टिळकांचे शव व्यवस्थित रीतीने चौरंगावर बसते करून त्यांच्या अंगावर शालजोडी घालून कपाळाला भस्म लावून पुष्पहार घालून सरदारगृहाच्या वरच्या मजल्याच्या गॅलरीत आणून ठेवले होते. त्यामुळे रस्त्यावरून परस्पर दर्शन घेऊन लोकाना जाता आले. पण गेले तेहि स्मशानयात्रेत परत सामील होऊन येण्याकरिताच गेले. टिळकांची स्मशानयात्रा मुंबईस होण्याचे ठरले तरी एक प्रश्न असा निघाला की नेहमीच्या म्हणजे सोनापूरच्या स्मशानभूमीत दहनसंस्कार करावा म्हटले तर गर्दीमुळे ते अशक्य होणार ! आणि गर्दी अनावर झाली म्हणजे लोकांचा चेंदामेंदा होईल आणि यात्रा सुरळीतपणे पार पडणार नाही. म्हणून समुद्रकाठच्या वाळवंटासारख्या प्रशस्त जागेत दहन केल्याशिवाय दुसरा इलाज नाही हे आपोआपच दिसून आले. पण नेहमींचे ठिकाण सोडून दुसरी एखादी जागा स्मशानभूमि बनवावयाची तर पोलिस अधिकाऱ्यांचीच नव्हे पण सरकारची परवानगी लागते. म्हणून काही लोक पोलिस कमिशनरकडे जाऊन त्याना भेटले. स्मशान- यात्रेचा मार्ग ठरविणे पोलिसकमिशनर यानाहि जरूरच होते. आणि दहनभूमि ठरल्याशिवाय स्मशानयात्रेचा मार्गहि ठरत नव्हता. शेवटी उभय- तानाहि चौपाटीवर दहून करणे हाच मार्ग सोयीचा दिसला. परंतु मुंबई सरकार यावेळी पुणे शहरी असल्यामुळे तारायंत्रावर संभाषण करून परवानगी मागणे अवश्य होते. त्याप्रमाणे पोलिस कमिशनरनी सर्व हकीगत सांगून चौपाटीची परवानगी मागितली. पण अशा वेळीहि सरकार मोठे दक्ष असते म्हणून त्यानी अशी शर्त घातली की "आज दहन करण्याला चौपाटीची परवानगी आम्ही विशेष प्रसंग म्हणून देतो. तरीपण या दहनभूमीवर पुढे आम्ही कोणताहि हक्क सांग-