पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अलौकिक स्मशानयात्रा ६८ घेऊन गावात लोकांना कळविण्याचे काम काही स्वयंसेवकानी चालविले होते. शनिवारी रात्री ९ वाजता टिळकाना श्वास लागला व मध्यरात्रीनंतर बारा वाजून चाळीस मिनिटानी म्हणजे उजाडत्या रविवारी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. सुमारे दहा वाजताच डॉ. देशमुख भडकमकर वगैरे मंडळीनी खोलीच्या बाहेर येऊन वर आभाळाकडे पाहून 'टिळक आता मनुष्याधीन स्थितीत राहिलेले नसून ईश्वराधीन झाले ' असे उद्गार किंचित् मोठ्याने मुद्दाम काढले. याचा अर्थ आता यापुढे वर कोणी फारसे येऊ नये व खालच्याच मजल्यावर बसून चिंतन करावे ! डॉक्टर मंडळी बाजूस सरल्यावर जवळच्या मंडळीनी टिळकांचे शरीर पलंगा- वरून उचलून खाली ठेवले. तेव्हापासून वरखाली सर्वत्र शांत झाले. आणि कानांत कुजबुजण्यापेक्षा मोठा आवाज कोठेही निघेनासा झाला. ( उजाडता रविवार ता० १ आगष्ठ रोजी ) बारा वाजून चाळीस मिनिटानी प्राणोत्क्रमण झाल्याची बातमी वरच्या मनुष्यानी खाली येऊन सांगितल्यावर एक दोन डॉक्टर मंडळी वर जाऊन खाली आली व त्यानी 'टिळक गेले' येवढ्या दोन शब्दात सगळ्यां हिंदुस्थानाला शोकात लोटणारी बातमी प्रगट केली ! (१९) अलौकिक स्मशानयात्रा ही वेळ मध्यरात्र उलटून गेल्यावरची असल्यामुळे पुढील कोणतीच गोष्ट सकाळपर्यंत कर्तव्य नव्हती. यामुळे खाली जमलेल्या मंडळीना एकत्र बसून दुःख करीत एकमेकाशी हळूहळू बोलत राहण्यापेक्षा दुसरे काहीच करता येण्यासारखे नव्हते. स्मशानयात्रा मुंबईसच व्हावी ही गोष्ट उघड होती. तथापि मुंबईच्या लोकाप्रमाणे शक्य तर आसपासच्या व पुण्यापर्यंतच्या लोकाना स्मशानयात्रेला हजर राहून टिळकांचे अखेरचे दर्शन घेण्याला सवड मिळावी या हेतूने, स्मशान- यात्रा उजाडताच न काढता ती थोडी पुढे ढकलून दोन प्रहरच्या सुमारास काढावी असे ठरले. त्याकरिता त्यांचा मृतदेह खालवर बर्फाने आच्छादून ठेवावा अशी सूचना करण्यात आली. पहाटे तीनचार वाजता चाहूल थोडथोडी सुरू होताच टिळकांच्या मृत्यूची वार्ता मुंबईस व आसपास पसरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हळूहळू लोक चहूकडून सरदारगृहाकडे येऊ लागले. आणि सकाळी सात साडे- साताच्या सुमारास तर सरदारगृहाचे दरवाजे स्वयंसैनिक ठेवून बंद करावे लागले. पुण्यास ही बातमी पहाटेच कळल्यामुळे प्रथम काही लोक मद्रासमेलनेहि येण्याला निघाले. नंतर सकाळच्या मेलमध्ये इतकी गर्दी झाली की तिकिट विचारणे व पाहणे ही गोष्ट अशक्य होऊन बसली. म्हणून रेलवे अधिकाऱ्यांनी लगेच एक स्पेशल ट्रेन काढली. पण तीहि भरून पुनः एक्स्प्रेसमध्ये गर्दी झालीच. होईल तितकी घाई करून मुंबईस लवकर पोचण्यांत पुण्याच्या मंडळींचा हेतू असा होता की शक्य तर टिळकांचे शव स्पेशल गाडीने किंवा मोटारीने पुण्यास न्यावे