पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ असो. बुधवार ता. २० पासून सोमवारपर्यंत ताप मलेरियाचा समजून उपाययोजना होत होती. पण पुढील सोमवारपासून न्युमोनियाची लक्षणे स्पष्ट दिसू लागली. प्रथम उजवीकडील फुफ्फुसाचा खालचा भाग सुजला. नंतर कोठा फुगला. यामुळे वरच्यावर उचकी लागून काळजावरहि दडपण पडूं लागले. पण औषध देऊन उचकी हटविताच बात उद्भवला व त्यानेच अखेर जोर केला. या दहा दिवसात ताप १०४ डिग्रीवर कधी वाढला नाही व ता. २७ रोजी थोडा घाम आल्याने उतार पडेल अशी डॉक्टराना आशाहि वाटली. तथापि ज्वर हे बाह्यलक्षण असून शक्तिपात हाच खरा रोग ठरला. व त्यावर काही इलाज चालला नाही. शनिवार ता. ३१ पर्यंत नाडी क्षीण होती तरी तिने दगा दिला नव्हता. ता. २७ पासून शुद्धि मात्र जाऊन येऊन असे. यामुळे भेटावयास येणाऱ्या मंड- ळीपैकी काहींना ते ओळखीत काहीना ओळखीत नसत. पण शनिवारी तिसऱ्या प्रहरपासून समूळ आशा सुटली होती. मात्र आजारीपणा हा असा आठ दहा दिवसांचा झाल्यामुळे जवळच्या व दूरच्या स्नेहीमंडळीना मुंबईस मुद्दाम येऊन टिळकांचे अखेरचे दर्शन व भेट घेता आली. व त्यातल्यात्यात ज्या एखाद्याशी त्याना एखादा दुसरा शब्द बोलता आला त्याने आपणाला भाग्यवान मानले. या त्यांच्या आजारात मुंबईतील बहुतेक सर्व स्नेही डॉक्टर मंडळीनी आपली नित्याची कामे जवळजवळ टाकून दिली होती व त्यांच्याभोवती तज्ज्ञ माणसांचा जागता पाहारा ठेवला होता. कोणच्याहि गोष्धीचे उणे पडू नये म्हणून स्वयंसेवक मंड- ळीनी वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत आपली माळ चोवीस तास- पर्यंत अखंड ठेवली होती. सरदारगृहाच्या मंडळीनीहि किती मेहनत घेतली असेल हे सांगावयास नकोच. तात्पर्य सर्वांनीच आपल्या श्रमाची व उद्योगाची पराकाष्ठा केली. पण शेवटी दैवाला 'तूंच डाव जिंकलास' असे म्हणून त्याना टिळकाना मृत्यूच्या स्वाधीन करणे प्राप्त झाले ! ता. २७ पासून समाचाराला येणाऱ्या मंडळीना रीघ नव्हती. पण डॉक्टर लोकांच्या पाहन्यामुळे पुष्कळ लोकांना परस्पर समाचार घेऊनच परत जावे लागले. मुंबईच्या दैनिक पत्नातून रोज एक दोन वेळ तरी टिळकांच्या आजाराची ताजी बातमी प्रसिद्ध होत होती. तरी पण आपापल्या सवडीप्रमाणे रात्नी दिवसा केव्हा तरी लोक येऊन समाचार घेऊन जातच. नेहमीच्या पक्षभेदाचा यावेळी कोणाच्या मनात मागमूसह नसल्यामुळे सर्व पक्षाचे लोक वेऊन टिळकांच्या व्यक्तीविषयी आपली आदरबुद्धि व सदिच्छा प्रगट करून गेले. आपल्या घरचे माणूस असे समजून सरदारगृहाच्या मालकानी टिळकांकरिता अनेक धर्मकृत्ये करविली. त्याप्रमाणे शह- रातील इतर काही लोकानीहि टिळकांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून शेकडो रुपये खर्चून दानधर्म केला. शेवटच्या दोन दिवसात तर तारायंत्राला टिळकांचा समाचार हेच एक मोठे काम होऊन राहिले होते. ता. ३१ रोजी पुण्यास कॉंट्रॅक्टर रानडे यांच्या घरचा टेलिफोन चोवीस तास खुला होता व जी ताजी खबर येईल ती