पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अखेरचा आजार ६६ टिळक चमनलाल याना म्हणाले " असहकारितेच्या तत्त्वावर विश्वास कोणाचा असणार नाही ? प्रश्न इतकाच की असहकारिता कोणत्या प्रकारची असावी. माझे तत्त्व असे आहे की जनतेच्या पुढे तर जावयाचे पण फार पुढे मात्र जावयाचे नाही. पुढारी जनतेपुढे थोडासा असला तर त्याला अनुयायी आपणाबरोबर नेता येतात. सर्व लोकांची मनापासून तयारी झाली म्हणजे असहकारिता काय सिन- फेन काय कोणताहि मार्ग सोपाच आहे. प्रागतिक आपल्याबरोबर येणार नाहीत. आणि आपण सर्वानी कौन्सिलातून अंग काढून घेतले म्हणजे आम्हीच देशाचे खरे प्रतिनिधी असे ते म्हणू लागतील. संघशक्ती नाही तोपर्यंत नुसत्या उच्च ध्येयाकडे पाहून काय करणार ? पंजाबातील अत्याचारांची पूर्ण भरपाई होईपर्यंत सुधारणांवर पूर्ण बहिष्कार घालावा हे तुम्हा लोकाना विलायतेत जाऊन बोल- याला ठीक आहे. पण येथे लोकशाहीचे सगळे सैनिक एकोप्याने झुंजण्याला तयार आहेत की काय हे पाहिले पाहिजे.” ( सयाजी विजय ता. ५ सप्टेंबर १९२० ). 66 किंचित् ताप अंगात होता तरी तसेच दिवाण चमनलाल सहज बाहेर हिंडून आला तर तुम्हाला थोडे बरे वाटेल " असे म्हणून त्याना मोटारीत घेऊन गेले व त्यानी टिळकाना बरेच दूरवर हिंडवून आणले. पण जुलै महिन्यात मुंबईस थोडीशी उष्णता असली तरी दिवस पावसाळी हवेचे म्हणून उघड्या गाडीतून दूरवर हिंडल्याने त्याना वारा बाधला म्हणा किंवा इतर कारणाने म्हणा त्याच रात्री त्याना थोडा अधिक ताप आला. आणि त्या दिवसापासून त्यानी जे अंथरूण धरले ते त्यांचे अखेरपर्यंत सुटले नाही. हायकोर्टाकडील अर्जांचे काम यावेळी न निघते तर टिळक मुंबईस न जाता सोलापूर यवत अशा कोरड्या हवेच्या जागी जाणार होते. सोलापूर येथील त्यांचे स्नेही पोलिस सुपरिंटेंडेंट पागे यानी टिळकाना आपला बंगला देऊ केला होता. पण मनुष्याच्या मृत्यूच्या दिवसाप्रमाणे त्याचे ठिकाणहि ठरलेले असते अशी आपणा लोकांची समजूत आहे त्याप्रमाणे या अर्जाच्या निमित्ताने टिळकाना मुंबईस जावे लागले व तेथेच त्यांचा अंत झाला. एकादृष्टीने मुंबईस ते आजारी झाले हेंच बरे कारण मुंबईइतकी निष्णात डॉक्टर लोकांची मदत इतर ठिकाणी कशी मिळणार ? आणि आपण आजारी होऊन आंथरुणाला खिळलो ही गोष्ट लक्षात येताच स्वतः टिळकांच्या तोंडूनच असे उद्गार निघाले की " मला मुंबईला येण्याची बुद्धि झाली ती माझ्या हिताचीच झाली. " पण आयुष्यच संपले तेथे धन्वंतरी झाला तरी काय करणार ? मुंबईच्या लोकांचे मात्र हित असे झाले की त्याना पुण्याशी आपली भाऊबंदकी सात्विकभावाने साधून घेता आली. कारण टिळकांचे सर्व आयुष्य पुण्यात गेले तरी हिंदुमात्राचा सर्वांत शेवटचा म्हणून मद्द- वाचा जो धर्मसंस्कार तो मुंबईस घडला. आणि टिळकांच्या साडेतीन हात- देहापैकी जो एखादा कण मृत्तिकारूपाने कदाचित् राहावयाचा तो मुंबईसच राहिला.