पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ कायम झाले होते तरी, त्यांचे सर्व इनामी उत्पन्न मूळ आपल्या देणगीचे असे म्हणून, १८७६ च्या एका कायद्याच्या आधाराने बाळा महाराज व कोल्हापूरकर छत्रपति यानी मिळून मुंबई सरकारासहि सामील करून घेऊन मुंबई हायकोर्टाकडे एक अर्ज केला होता. पण तो अर्ज शेवटी हायकोर्टाने नामंजूर केला हेहि आम्ही त्याच प्रकरणात सांगितले आहे. आणि टिळकानी आपल्या इच्छेने नवीन म्हणून जे काम या शेवटच्या दिवसात अंगिकारले ते हायकोर्टाकडील या अर्जाच्या बाब- तीत जगन्नाथ महाराजांच्या बाजूची कैफियत तयार करणे हे होय. या कामी त्यानी सुमारे पंधरा दिवस खर्चून एखाद्या उत्कृष्ट कायदे पंडिताप्रमाणे अत्यंत समर्पक व साधार अशी कैफियत तयार केली. व तिच्याच वरून जगन्नाथ महाराज यांचे वकील हायकोर्टात भांडले व त्यांनी तो दावा जिंकला. पण हे काम चालू असता टिळकाना पुण्यासच मलेरियाचा ताप येऊ लागला होता. ताप याचा घाम निघावा ताप कमी व्हावा थोडी हुशारी वाटावी फिरून ताप यावा असा क्रम सुरू असताहि टिळक ही कैफियत तयार करण्यात गुंतले होते. अर्जाच्या सुनावणीची तारीख १४ जुलै ही लागली होती. म्हणून मुंबईस जाणे जरूर आणि हवापालट झाल्याने मलेरियाचा तापहि थोडा हटेल. या हेतूने ता. १२ जुलै रोजी ते नेहमीप्रमाणे सरदार गृहात जाऊन उतरले. पुढील दोन दिवसात आपण तयार केलेल्या कैफियती वरून त्यानी वकील बॅरिस्टर लोकाना कज्जा समजावून दिला. ठरल्याप्रमाणे ता. १४ रोजी अर्जाची सुनावणी झाली व ता. २१ रोजी हायकोर्टाने अर्ज नामंजूर करून काढून टाकला प्रति- वादीचा खर्चहि देवविला. आणि टिळकाना फार मोठे व शेवटचे असे हे यश वळवून दिले. हे मोठे यश म्हणण्याचे कारण असे की हा अर्ज मंजूर झाला असता तर जगन्नाथ महाराजांचे सर्व उत्पन्न कोल्हापूर दरबारच्या स्वाधीन झाले असते. आणि जगन्नाथ महाराज हे आपल्या दत्तक वडिलांच्या श्राद्धपक्षाचे केवळ धनि होऊन राहिले असते. (१८) अखेरचा आजार ता. २० जुलै १९२० रोजी दिवाण चमनलाल हे सहज टिळकांच्या भेटीला गेले. टिळकाना किंचित् ताप आला होता. चमनलाल म्हणाले " एक महिनाभर काश्मिराकडे का जात नाही ? ” टिळक म्हणाले " इतके लांब जाऊ शकत नाही. पुण्याच्या आसपासच कोठे तरी जाईन म्हणतो. " चमनलाल यानी अखिल भारतीय मजूर परिषदेचे उपाध्यक्ष होण्याला टिळकाना विनंती केली. ती मान्य करून ते म्हणाले “ मजूरवर्गाकडे माझे लक्ष आहे. १९०८ साली मला शिक्षा झाली तेव्हा गिरणीमजुरानी माझ्याबद्दल केवढे प्रेम व्यक्त केले !" हे बोलताना टिळकांचे ऊर भरून आले. चमनलाल म्हणाले " विलायतेत तुम्ही मजूरपक्षाचेच म्हणवून घेत होता. ". नंतर असहकारितेवर बोलणे निघाले तेव्हा