पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ ताईमहाराज प्रकरणातले भरतवाक्य ६४ नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यानी त्याची कड पोचविली. आजपर्यंत टिळकानी अनेक जाहीर बाद केले पण ते करताना त्याना वाईट वाटले नव्हते. कारण ते बोलून चालून प्रतिपक्षाशी. पण हा वाद आपल्याच पक्षातील पूर्वीच्या एका व्यक्तीशी करावयाचा होता आणि अशा मनुष्याने स्वतः टिळकावर व आपल्याच पक्षातील इतर कित्येक लोकावर असे आरोप केले होते की ते प्रतिपक्षानेहि कधी केले नव्हते. पण येथेहि पूर्वी सांगितल्याप्रमाणे वाद अप्रिय म्हणून किंवा आक्षेपक व्यक्ती आता त्याज्य म्हणून मी गप्प बसेन तर त्याचा भलताच गैरसमज होईल या भीतीने, आणि स्वतःचे मत प्रगट करणे हेच न्यायाचे व अत्यंत अवश्यक होते येवढ्याकरिताच, तो वाद त्यानी हाती घेतला. व एरव्ही कधीहि दुःख झाले नव्हते इतक्या दुःखाने पण स्वाभाविक आवेशाने तो त्यानी केला. मरणापूर्वी त्याना अनेक गोड घास खावयास मिळाले होते. पण बदाम खाता खाता मध्येच एखादा कडू बदामहि दाताखाली सापडतो आणि त्याचा कडवटपणा व वाईट वास तोंडात बराच वेळ राहतो तशी टिळकांची स्थिति या वादात झाली. आणि तो वाद इतका वाईट झाला की आज त्याचा पुनरुच्चार करून हा ग्रंथ आम्ही दूषित करू इच्छित नाही. इतरहि एकदोन बाबीत त्याना असेच कडू घास अखेर खावे लागले, पण त्या घासानी कडू झालेले तोंड स्वतः टिळकानीहि बाहेर दाखविले नाही. यामुळे त्यांचा उल्लेख करण्याचे आम्हाला मुळीच कारण नाही. (१७) ताईमहाराज प्रकरणातले भरतवाक्य टिळकासारख्या अनेकविध व्यवसायाच्या व संसारिक मनुष्याला असे प्रसंग क्वचित यावयाचेच. कारण इतरांप्रमाणे त्यांच्याहि कुंडलीत सगळे नऊच्या नऊ ग्रह होते. ते एकंदरीने भाग्यवान असले तरी छळणारे ग्रह त्यांच्या कुंडलीतून काढून टाकण्याचे काम कोणाहि ज्योतिषाला करता आलेले नव्हते. अर्थात त्यानाहि कर्मभोगाचा अनुभव जसा चांगला घेता आला तसा थोडासा वाईटहि घ्यावा लागला. त्याला इलाज नाही. तथापि अखेर जिंकावयाची असाच त्यांच्या आयुष्यातील सर्व खेळांचा परिणाम झाला. म्हणून त्याना शेवटी जो एक गोड घास खाऊनच मृत्यू आला त्याविषयी मात्र दोन शब्द लिहितो. स्वराज्य संघाच्या शेवटच्या सभेत टिळक बोलून गेलेच होते की 'वृद्धावस्थेत माझ्या सर्व शक्ती क्षीण होत चालल्या आहेत म्हणून कोणतेहि एखादे नवे काम मी यापुढे अंगावर घ्यावे की नाही हे लोकानी माझ्या इच्छेवरच सोपवावे.' त्यांच्या शक्ती क्षीण होत चालल्या होत्या याचा अनुभव पुढे एक महिन्यात आलाच. तथापि या शेवटच्या महिन्यातहि त्यानी एक अवश्यक व आवडीचे असे नवे काम हाती घेतले. ते म्हटले म्हणजे त्यांचे आवडते मानसपुत्र श्री. जगन्नाथ महा- राज याना स्थिरपद करण्याचे होय. पूर्वी ताईमहाराज प्रकरणाच्या शेवटी आम्ही हे सांगितलेच आहे की प्रिव्ही कौन्सिलमध्ये जगन्नाथ मद्दाराज यांचे दत्तविधान