पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र पुनः प्रस्थापित करून घेण्यात मी मदत करतो. आहे. बंगालचे लोक भाग १ सातारच्या सभेचा ठराव ठीक समेटाला विरुद्ध नाहीत व प्रत्येक सभेला व परिपदेला उभयपक्षाचे लोक हजर राहतात. मग समेट का घडून येऊ नये ? (४) कार्ल ब्रेशहॉफ यांचे केळकराना पत्र ब्रट्झबरी ३० एप्रिल १९१४ टिळकांच्या खटल्याच्या पुस्तकाची एक प्रत आणखी पाठवा. टिळ- कांच्या खटल्यावर 'न्यूएज' वर्तमानपत्रात मी लिहिलेला लेख तुम्ही वाचलाच आहे. शिवाय टिळक सुटण्याच्या सुमारास आणखी एक लेख त्या पत्रात लिहि- ण्याची माझी इच्छा आहे. (५) मुंजे यांचे केळकराना पल नागपूर ता. २१ जून १९१४ टिळक सुटून आल्याची तार येथे पोचताच शहरात एकच खळबळ उडाली. लोकानी पेढे वाटले आपली घरें शृंगारली सर्व शहरभर उत्साह दिसून येत होता. सायंकाळी व्यंकटेश नाटकगृहाच्या पाठीमागील मैदानांत सुमारे पाच हजार लोकांची सभा भरली. त्यांत सर्व पक्षाचे जातीचे व धंद्याचे लहानथोर लोक हजर होते. सन्मान्य वकील नीळकंठराव उधोजी हे अध्यक्ष असून अभिनंदनाचा ठराव पुढे मांडताना त्याना गहिवरून आले. स्वतः मी ( डॉ. मुंजे) अळेकर भवानी शंकर वकील यानी ठरावावर भाषणे केली. अशा वृद्धावस्थेमध्ये मधु- मेहासारख्या रोगाने शरीर जर्जर झाले असता तुरुंगाच्या हालअपेष्टा सोसण्याचे सामर्थ्य परमेश्वराने त्यास दिले तसेच या पुढेहि त्यास आयुरारोग्य द्यावे अशी परमेश्वराची प्रार्थना करण्यात आली. पटांगणाच्या मध्यभागी देवळाच्या शिख- रावर सर्वास दिसेल अशा ठिकाणी टिळकांची मोठी तसबीर लावली होती. त्यावर सर्वानी मंत्रपुष्प अक्षता व फुलें याची वृष्टी केली. सर्वेट ऑफ इंडिया सोसायटीचे द्रवीड यानी अध्यक्षांचे आभार मानल्यानंतर सर्वास साखर वाटण्यात आली व " टिळक महाराज की जय" अशा जयजयकारात सभा बरखास्त झाली. (६) माँडफर्ड कलेक्टर यांचे टिळकाना पत्र पुणे २६ ऑगस्ट १९१४ तुम्ही आपल्या गणपतीबरोबर मिरवणुकीत जाणार आहात असे सम- जते. हल्लीच्या प्रसंगी तुम्ही तसे करू नये अशी सरकारची इच्छा आहे. पण तुम्ही तसे करीत नाही असे कळवाल तर मॅजिस्ट्रेटच्या नात्याने मी हुकूम काढीत नाही.