पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २ ) यानी विषयवार इंडेक्स कार्डे तयार केली. श्री. वि. पां. दांडेकर बी. ए. यानी स्वयंसेवक या नात्याने मधूनमधून लेखकाचे काम केले. आणि बाईचे इनामदार श्री. बाळासाहेब साठे यानी आक्टोबर महिन्यात काही दिवस पाचगणी येथील आपले घर आम्हाला राहावयास दिल्यामुळे तेथे एकांतवासात बराच मजकूर लिहून झाला. या कारणांकरिता मी वरील सर्वांचा फार आभारी आहे. या ग्रंथाचा पूर्वार्ध व हल्लीचा हा उत्तरार्ध यांच्या स्वरूपात मुख्य फरक काय आहे हे वाचकाना न सांगताहि लक्षात येण्यासारखे आहे. या उत्तराधीत वर्णन केलेला टिळकांच्या कारकीर्दीचा दुसरा भाग तुलनात्मक दृष्टीने अर्थात् बराच अधिक महत्त्वाचा होय. चरित्रलेखकाच्या दृष्टीने सांगण्यासारखा फरक हा की या भागाच्या संबंधात चरित्रलेखनाची साधने अधिक उपलब्ध झाली. विशेषतः या उत्तरार्धात सुमारे साडेचारशे पत्रे छापता आली. अस्सल पत्रांची मौज ही असते की ती अधिक विश्वसनीय तर असतातच परंतु पत्र-लेख- नाच्या काळच्या परिस्थितीवर अनेक बाजूनी प्रकाश पाडणारीहि असतात. श्री. स. वि. बापट यांच्या 'आठवणी व आख्यायिका' या पुस्तकाच्या दोन भागांचाहि उपयोग थोडथोडा झाला. या ग्रंथाचा तिसराहि भाग येत्या ऑगस्ट- मध्ये प्रसिद्ध होणार आहे. व या तीनहि भागांच्या योगानें आणखी एका वेगळ्या रीतीने टिळक-चरित्र कोणास लिहिण्याची स्फूर्ति झाली तर त्याला ते साधन उपयोगी पडण्यासारखे आहे. थोर लोकांची चरित्रे अनेक प्रकारानी लिहिली जाऊ शकतात. मी लिहिले ते मुख्यतः घडलेला इतिहास संगतवार सांगण्याच्याच दृष्टीने लिहिले आहे. हल्लीच्या या ग्रंथात अनुच्चारित अनुस्वार न लिहिण्याची नवी पद्धति मी स्वीकारिली आहे. तसेच प्रत्येक भागाच्या शेवटी पृष्ठसंख्या पुरी करून पुनः नव्या भागाला नवा क्रमांक सुरू केला आहे. या दोन्ही सुधारणा सकारण आहेत याहून त्यांचे अधिक समर्थन येथे करीत नाहीं. मकरसंक्रांत शके १८४९ पुणे १० जानेवारी १९२८ } न. चिं. केळकर.