पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

8192 प्रस्तावना 9232/7. Ka सारी 26101 कल्पाप्रमाणे टिळकचरित्राचा ग्रंथ आज संपूर्ण होऊन हातावेगळा करिता येत आहे याविषयी आनंद होतो. संक या ग्रंथाचा पूर्वार्ध १९२३ च्या एप्रिलात लिहून झाला. त्यानंतर हा उत्त- राधे लिहिण्याला हाती घेण्यास जवळ जवळ पाच वर्षे लागली. इतका विलंब लागण्याची कारणे वाचकाना सांगितल्याशिवायहि ध्यानात येण्यासारखीच आहेत. अर्थात् असली कारणे केव्हांहि संपत नसतात. तथापि हाती घेतलेले हे काम अर्धेच राहिले तर ते मुळी न केल्यासारखेच झाले असे नेहमी वाटे. ग्रंथ पुरा करण्याकरता जमवून ठेवलेली साधनसामुग्री रोज दृष्टीला पडून आपला परामर्ष न घेतल्याबद्दल निषेध करीत होती. वाचकवर्गहि दरवर्षी टिळकांच्या जन्मतिथीच्या किंवा मृत्युतिथीच्या सुमारास, ग्रंथाची आठवण ठेऊन, खासगी रीतीने व केव्हा वर्तमानपत्रातूनहि, उरलेला ग्रंथखंड वाचावयास लवकर मिळावा अशी अपेक्षा प्रकट करीत होता. आणि स्वतःच्या संकल्पाला हे उत्तेजन समजून ग्रंथ पुरा करून लवकरच हाती देईन अशी आश्वासने मीहि त्याना कृतज्ञताबुद्धीने देत होतो. वरील सर्व कारणांकरिता केव्हा तरी निश्चयाने बसून ग्रंथ पुरा करणे हे अनिर्वाय झाले होते. छपाईचे काम सुरू करण्याचे मनात आणताच येथील 'श्रीगणेश प्रिंटिंग वर्क्स' आणि 'श्रीसमर्थ भारत' छापखाना यानी ताबडतोब छाप- ण्यास प्रारंभ करण्याची तयारी दाखविली. आणि गेल्या दोन महिन्यात इतर कामे बाजूला ठेऊन मोठ्या तत्परतेने हे काम त्यानी करून दिले म्हणूनच हा ग्रंथ इतक्या लवकर प्रसिद्ध करता आला. चालू जानेवारी महिन्यात असेंब्लीच्या कामावर जाऊन रुजू होण्यापूर्वी मी पुण्यास असता, हे काम समक्ष उरकले तरच ते पार पडते, एरवी पुढे उन्हाळ्यात छपाईचे वगैरे काम संपवून ता. १ ऑगस्टच्या पूर्वी कबूल केल्याप्रमाणे वाचकांच्या हाती पुस्तक देणे अशक्य होणार असे मला अनुभवाने आढळून आले होते. कसेहि असो. घाईत घाई करून का होईना ग्रंथ पुरा करण्याचा संकल्प तडीस गेला, आणि टिळकांच्या येत्या पुण्णतिथीच्या आधीच पाच महिने तो वाचकांचे हाती देता आला याबद्दल वरील दोन्ही छाप- खान्यांचे चालक यांचे आम्ही अत्यंत आभारी आहो. तसेच कोकाटेबंधूनी दुसऱ्या खंडाची पुस्तके त्वरित बांधून देण्याचे कबूल केले, या ग्रंथाची साधन- सामुग्री पुष्कळ दिवसापासून काळजीपूर्वक व आस्थेवाईकपणे वेळोवेळी जमवून ठेवणे, ग्रंथ लिहून होत असता ती वेळच्यावेळी लागेल तशी पुरविणे, आणि संदर्भ उतारे अवतरणे वगैरे काढून देणे, इत्यादि गोष्टींचे सहाय्य चिरंजीव काशिनाथ नरसिंह ऊर्फ बापूराव केळकर याने केले. श्री. पां. वा. गाडगीळ 'वाङ्मयविशारद