पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथरचनेची समजूत या चरित्राचा पूर्वार्ध १९२३ साली प्रसिद्ध झाला. त्यात सन १८९९ सालापर्यंतची हकीकत दिलेली आहे. त्याला 'खंड पहिला' असे नाव दिलेले आहे. त्यात एकंदर २८ भाग असून पृष्ठसंख्या ६७२ आहे. हल्लीचा ग्रंथ त्याच चरित्रग्रंथाचा पुढील व उरलेला संपूर्ण अंश असून त्याला उत्तरार्ध असे नाव दिलेले आहे. सोयीकरिता या उत्तराधी चेहि दोन विभाग करून पूर्वीचा क्रम पुढे चालू ठेवला आहे. पैकी पहिल्याला 'उत्तरार्ध खंड दोन' व दुसऱ्याला 'उत्तरार्ध खंड तीन' अशी नावे दिली आहेत. या 'उत्तरार्ध खंड दोन' मध्ये एक ते नऊ भाग असून त्यांची पृष्ठसंख्या ५५२ आहे. 'उत्तरार्ध खंड तीन' यामध्येहि एक ते नऊ इतके भाग असून त्याची पृष्ठसंख्या मात्र ७०४ आहे. अशा रीतीने या समग्र चरित्र ग्रंथाची एकंदर पाने १९४४ होतात ती अशी:- पूर्वार्ध - खंड १ भाग २८ एकंदर पानांची संख्या ६८८ उत्तरार्ध - खंड २ भाग ९ एकंदर पानांची संख्या ५५२ उत्तरार्ध - खंड ३ भाग ९ एकंदर पानांची संख्या ७०४ पूर्वार्ध ५ वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला व त्यानंतर उत्तरार्ध हल्ली प्रसिद्ध होत आहे म्हणून संदर्भ देता घेता वाचकांचा घोटाळा होऊ नये म्हणून हा सर्व खुलासा करणे अवश्य आहे.