पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ टिळक म्हणाले की "तिकडे याहून अधिक चळवळ झाली पाहिजे. राष्ट्रसंघ हे एखादे सोंग का असेना! पण काही तरी निमित्त काढून त्याच्यापुढे गेले पाहिजे. आपले म्हणणे मांडले पाहिजे. आणि युरोपियन राष्ट्रापुढे आपली गाऱ्हाणी मांडावयाची असली तर काँग्रेसशी असलेला आपला संबंध तोडून चालावयाचे नाही. तिच्याशी संबंध ठेवावयाचा पण तिच्या ठरावाची अंमलबजावणी स्वतंत्र रीतीनेहि करा- वयाची. आमच्या संघाने स्वतःच्या खर्चाने शिष्टमंडळ पाठविले, पण त्याने, आणि सर्वोपैकी त्या एकट्यानेच, काँग्रेसच्या धोरणाला धरून काम केले. पुष्कळाना भ्रम होता की विलायतेत स्वातंत्र्याची हवा आहे म्हणतात तेव्हा टिळक येथे वसाहतींचे स्वराज्य मागतात तर तेथे जाताच स्वातंत्र्य मागतील ! पण मी काँग्रे- सच्या मागणीपेक्षा एक रतीभर कमी मागितले नाही व ज्यास्तद्दि मागितले नाही. आणि मी स्वातंत्र्य भागितले नाही म्हणून आमच्यातल्याच कित्येक लोकानी मला मवाळ ठरविले ! पण मला कॉंग्रेसविरोधी जहाल किंवा मवाळ या- पैकी कोणतेच व्हावयाचे नव्हते. मी काही लोकांची तन्हा पाहिली ती अशी की इकडे खटल्याच्या भीतीने अगदी नेमस्त बोलावयाचे आणि तिकडे ती भीति फारशी नाही म्हणून जहालपणे वाटेल ते भक्त सुटावयाचे. दुसरे काही असे पाहिले की इकडे ते वाटेल तितके जहाल पण विलायतेतल्या लोकाना नेमस्त- पणाचे माफक बोलणे आवडते म्हणून नेमस्त भाषा वापरावयाची. तिसरे काही असे पाहिले की इकडे सुधारणा अपुऱ्या आहेत म्हणून सांगावयाचे व तिकडे तेवढ्या पुरतील असे म्हणून काँग्रेस व स्वराज्यसंघ याना वेड्यात काढावयाचे. मी स्वतः निवडणुकीला उभे राहावे अशी सूचना गंगाधररावानी केली पण वृद्धावस्थेत सर्व शक्ति क्षीण होत असता नवे एखादे काम अंगावर घ्यावे की नाही याचा निर्णय तुम्ही माझ्या इच्छेवरच सोपवावा. अशा रीतीने हा चिरस्मरणीय प्रसंग समास झाला. ג, ता० २७ मे रोजी टिळक इतर मंडळीसह बनारस येथे भरणाऱ्या ऑल- इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभेला जाण्याकरिता मुंबईहून निघाले. गांधीहि त्याच गाडीत होते. बनारसेस ता० ३० रोजी सकाळी गंगेच्या घाटावर टिळकाना पंड्ये व गंगापुत्र वगैरे मंडळीनी संस्कृत मानपत्र दिले. ता० २९ रोजी टाऊनहॉलच्या मैदानात व ता० १ जून रोजी ब्रह्मघाटावर टिळकांची दोन व्याख्याने झाली. व या दुसऱ्या प्रसंगी नागरिकानी संस्कृतात मानपत्र दिले. ता० १ जून रोजी टिळक काशीक्षेत्रातील अनेक संस्था पाहण्यास गेले. बनारसेहून परत येताना टिळकानी जबलपूर येथे त्यांचे परम स्नेही काँट्रॅक्टर साने यांच्या निमंत्रणावरून दोन दिवस मुक्काम केला. तेथे ता० ३ रोजी गोलबझारच्या पटांगणावर व ता० ५ रोजी टाऊनहॉलमध्ये टिळक व खापर्डे यांची व्याख्याने झाली. यानंतर परत आल्यावर फंडासंबंधाने काही एक वाद उत्पन्न झाला. त्यात टिळकाना नाइलाजाने पडावे लागले, आणि ते त्यात एकदा पडल्यावर त्यांच्या