पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ पर्स फंड. समर्पण - सभारंभ ६२ हटकून निवडून येणार पण आपापसात स्पर्धा व चुरस लागली तर पक्षाला हटकून अपयश येणार ! अशी ही आपत्ति होती. तेव्हा ती दळण्याला एकच मार्ग. तो असा की पक्षाचे म्हणून एक पंचायत मंडळ नेमावे. आणि एका जागेकरिता उभे राहणाऱ्या आपल्याच पक्षाच्या उमेदवारापैकी काम करण्याच्या व निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अधिकात अधिक सरस कोण याचा निकाल देण्याची जबाबदारी त्याने स्वीकारावी. उलट जे अनेक उमेदवार उभे राहतील त्यानीहि या मंडळाचा निकाल हा आपल्या एकंदर पक्षाचा निर्णय असे निष्ठापूर्वक समजावे. आणि त्या एकाच उमेदवाराला सर्वांनी मनोभावे मदत करावी. त्याप्र- माणे टिळक बैद्य करंदीकर व वेळवी यांचे मंडळ नेमण्यात आले. शेवटी समारोपादाखल टिळकानी विस्तृत भाषण केले व आपल्या मंडळीस राजकारणाचे स्पष्ट धोरण आखून देणारे असे त्यांचे शेवटचे भाषण हेच होय. ते म्हणाले:- " सुधारणांचा शक्य तितका उपयोग करून घ्यावयाचा की नाही हा प्रश्न आता उरलेला नाही. शक्य तितका उपयोग करून घ्यावयाचा. व तो करून घेता घेता पूर्ण स्वराज्य मिळण्याची खटपट करावयाची. असे आपले धोरण निश्चित झाले आहे. तरी प्रत्येक जिल्ह्यात आपले उमेदवार उभे केले पाहिजेत. मनुष्य आपल्या पक्षाचा आणि सरकारशी योग्य रीतीने झगडणारा असा अस- ल्यास व तो निवडून येण्याचा अधिक संभव असल्यास तो पसंत करावा. मग तो कोणत्याहि धर्माचा जातीचा पंथाचा असला तरी चालेल. तंटा जातीचा नाही फक्त मताचा आहे. तसेच एखादा उमेदवार इंग्रजी चांगले न जाणणारा असला पण इतर रीतीने तो शहाणा असला तर त्यालाहि निवडून द्यावा. इंग्रजी भाषेची सन्रच सांगू नये. कारण कौन्सिलात मत कोणच्या बाजूने द्यावयाचे हाच मुख्य प्रश्न असतो. व इंग्रजी न येणाऱ्यालाहि आपल्या पक्षाचा पुढारी ज्या बाजूला मत देतो तिकडे आपण द्यावे हे सहज कळते. नव्या कौन्सिलातील काम हे थोडेसे घोटाळ्याचे आहे. कारण आपण निवडून दिलेला मनुष्य गव्हर्नराने नेमला तर व ठेवील तोपर्यंत दिवाण होणार. सुधारणा थोड्या आहेत. त्यानी मिळणारी सत्ता थोडी आहे. म्हणजे कौन्सिलच्याच कामाकरिता कोणी सर्वस्व वेचावे असे महत्त्व त्याला नाही. तथापि तेहि एक काम पक्षाच्या दृष्टीने कर्तव्य आहे असे समजून केले म्हणजे मग ते करण्यात कालाचा अपव्यय झाला असे वाटणार नाही. " नंतर संघावर आलेल्या अनेक आक्षेपाना टिळकानी उत्तरे दिली. कारण काही व्यक्तीनी काही विशेष कारणावरून नाराज होऊन टिळक स्वराज्यसंघ शिष्टमंडळ या सर्वा- बर वाटतील ते आक्षेप घेतले होते आणि दूषणे दिली होती. ती अधिकारयुक्त वाणीने खोडून काढणे हे आपले कर्तव्य आहे असे समजूनच त्यानी हे अप्रिय काम केले. ते म्हणालेच " मी न बोललो तर हे आक्षेपक उद्या अशा फुशारक्या मारीत सुटावयाचे की आम्ही आक्षेप प्रसिद्धपणे घेतले त्यानंतर यांची परिषद भरली पण तीत त्यानी आम्हाला उत्तरे दिली नाहीत.” विलायतेतील चळवळीसंबंधाने