पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ लोकानी जे औदार्य दाखविले त्या संबंधाने ते म्हणाले की "मी फिर्याद केली ती व्यक्तिशः चिरोल साहेबावर असली तरी खरे युद्ध सरकारशीच होते. याचे प्रत्यं- तर खटल्यात सर एडवर्ड कार्सन यानी 'हा खटला टिळकानी जिंकला तर इंग्रज सरकारावर अनर्थ गुदरेल व त्याना हिंदुस्थानात राज्य करणे कठिण जाईल' असे उद्गार काढले यावरूनच मिळणारे आहे. आणि या खटल्याचे सार्वजनिक स्वरूप लक्षात घेऊनच लोकानीहि एवढा फंड जमविला. हा फंड मजकरता उभारून खरो- खर लोकानी आज मला विकत घेतले आहे. " टिळकांचे भाषण झाल्यावर खापर्डे कौजलगी वगैरे गृहस्थांची भाषणे होऊन हा अपूर्व समारंभ समाप्त झाला. दुसरे दिवशी टिळकांच्या वाड्यात स्वराज्यसंघाची चवथी वार्षिक सभा भरली होती. आदले दिवशी समारंभाकरिता आलेली मंडली दुसरे दिवशीच्या सभे- करिता बरीचशी राहिली होती. कारण आदले दिवशीचा समारंभ व टिळकांचे भाषण ही केवळ फंडासंबंधी होती. पण संघाच्या सभेत पुढील निवडणुका व राजकीय धोरण यांजविषयी टिळक विस्तृत भाषण करतील अशी लोकांची अपेक्षा होती ती सफळ झाली. प्रारंभी कामाचा अहवाल व तपासनीसानी तपासलेले हिशेब सभेपुढे मोडले. नंतर विलायतेस गेलेल्या शिष्टमंडळाच्या कामाचा वृत्तांत वाचण्यात आला. त्यानंतर रीतीप्रमाणे संघाचे अधिकारी व शिष्टमंडळाचे सभासद यांचे आभार मानण्यात येऊन नव्या निवडणुकी केल्या. संघाच्या हाती असलेल्या शिलकेचा उपयोग कसा करावा ? म्हणजे ती शाखावार वाटून देऊन कारण पडेल त्याप्रमाणे मुदलातूनही खर्चावी ? किंवा कोणतीहि एक मोठी रक्कम म्हणजे सुमारे एक लक्ष रुपये गंगाजळीप्रमाणे कोठे तरी सुरक्षित व्याजी लावून व्याजातून नित्य खर्च करावा व नैमित्तिक कामाकरिता स्थानिक किंवा सार्वत्रिक वर्गणी गोळा करावी ? पैकी काही लोक एका योजनेला व काही दुसरीला प्रतिकूल होते. अखेर फक्त दोन मते विरुद्ध पडून दुसरी सूचना मंजूर झाली. अमेरिकेत लजपतराय व हर्डीकर यानी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कारण त्यातले काही काम अमेरिकेतील संघ ही पुणे संघाची शाखा या नात्यानेच कर. ण्यात आले होते. काँ० डेमोक्रॅटिक पार्टीचा जाहीरनामा पूर्वी टिळकांच्या विद्यमाने प्रसिद्ध झाला होता तो मंजूर करण्यात आला. यानंतर एक महत्त्वाचा पण थोडासा नाजुक प्रश्न उद्भवला तो असा की पुढील निवडणुकीकरिता या नव्या पार्टीतर्फे योग्य उमेदवार उभे करून एका जागेकरिता अनेक उमेदवारांची उभे राहण्याची इच्छा असेल तर त्या अडचणीचा निर्वाह कसा करावा ? दरेक जिल्ह्यात या पक्षाच्या वाट्याला कौन्सिलातील एखाद दुसरीच जागा येणार. काही जागा राखीव. काही इतर कारणानी हातच्या जाणार. उरलेल्या जितक्या जागा त्याहून अधिक अनेक लायक हौशी उमेदवार निवडणुकीची इच्छा धरणार. बरें त्यातील एकच पसंत करून त्यावर पक्षाने आपले सर्व बळ एकवटले तर तो