पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५९ लो. टिळकांच चरित्र भांग ६ त्याना आजपर्यंत शिशुपाल हेहि नाव शोभत होते. पण आता ते पशुपाल बनले आहेत. परांजप्याचे राजकीय आजेपणजे 'टिळक हे तेली तांबोळ्यात मिस- ळून सवंग लोकप्रियता मिळविण्याकरिता त्याना मवाळपक्षाशी विरोधाला प्रवृत्त करतात. टिळकांचा जोर म्हणजे 'क्रूट फोर्स' आहे' असे म्हणत असत. पण आजपर्यंत राष्ट्रीय पक्षाने सोलापुरास घडले त्याप्रमाणे लाचलुचपतीने व भूलथापीने अक्षरशून्य आडमुठ्या लोकाना काँग्रेसचे किंवा परिषदांचे प्रतिनिधी बनवून या पेंढाराकाडून पेंढारीपणा करविला नव्हता. त्यांचे प्रतिनिधी नेमस्तांच्या दर्जाचेच असत. स्वतःच्या खर्चाने सभाना जात. आणि प्रत्यक्ष नियमांचे उल्लंघन होई- पर्यंत व मवाळपक्षाने दांडगाईस प्रारंभ करीपर्यंत ते सुरतेसहि जागेवरून हलले नव्हते. पण आता यानी भूतपिशाच्च वेतालादिकांचे गण आपल्या भोवती जम- वून सभा उधळण्याचा संकल्प केला. आणि चंदावरकरासारखे लोक ही गंमत पाह- ण्याला आले होते. त्याना सोलापुरच्या काही रावबहादुरानी मदत केली. आणि हे सर्व करून आपल्या पराक्रमाचा डांगोरा मुंबईच्या पत्रातून पिटला. पण हा स्यांचा कावा सिद्धीस गेला नाही. बेझंटबाईचीहि पूतना हरिवधार्थमाययौ । प्राप तत्र वधमेव ह्यात्मनः || 32 अशी स्थिति झाली. परांजप्यानी रानड्यांच्या नावाला काळीमा आणला. परांजप्यांच्या विद्वत्तेला व शीलाला काळीमा आणणारी अशी ही गोष्ट झाली. टिळक व नेमस्त लोक यांच्यातील हा बहुधा शेवटचाच सामना होय. यानंतरहि वर्तमानपत्रातून वाद चालूच होता. व त्यात ओघाने विलायतेत घडलेल्या स्पर्धेच्या व चुरशीच्या प्रसंगांचीहि झडती निघाली. (१५) कॉ. डेमोक्रॅटिक पार्टीचा जाहीरनामा पण हा वाद संपवून पुढील निवडणुकीच्या कार्याला लागणे अवश्य होते. म्हणून काही दिवसांपूर्वी स्वराज्यसंघाने टिळकांकडे लोकशाही पक्षाचे धोरण ठरविण्याचे जे काम सोपविले होते ते त्यानी केले. आणि ता. २० एमिलच्या केसरीत काँग्रे- समधील लोकशाही पक्षाचे धोरण काय असावे याविषयी आपली योजना प्रसिद्ध केली. ही योजना ' कॉंग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीचा मॅनिफेस्टो' या नावाने प्रसिद्ध आहे. या जाहीरनाम्यावर पहिला हा आक्षेप घेण्यात आला की तो टिळकांचा व्यक्तिशः जाहीरनामा होता. पण त्याला असे उत्तर होते की वास्तविक हा जाहीर- नामा टिळकानी तयार केलेला म्हणून प्रसिद्ध झाला तरी त्यानी अनेक लोकांची संमति घेतली होती. गुजराथच्या काही गृहस्थांशी व सिंधच्या काही गृहस्थांशी टिळ- कानी त्याविषयी चर्चा केली होती. फार काय पण गांधी व जीना यानाहि टिळ- कानी कच्चा खर्डा दाखविला होता. शिवाय तो मुंबई इलाख्यापुरताच होता. इतर प्रांतातील जाहीरनामे पाहिले तरी ते यासारखेच होते. नेहरू व मदनमोहन यानीहि त्यातली तत्त्वे मान्य केलेलीच होती. दुसरा एक आक्षेप असा होता की