पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सोलापुरची प्रांतिक परिषद ५८ "ता. २ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परिषदेच्या मंडपाकडे सुमारे ७/८ शे इसमांचा घोळका गलबला करीत येऊ लागला. सदर लोक मंड- पात घुसणार अशीहि बातमी पसरली. मंडपाच्या पाठीमागच्या दारावर रँ परांजपे कामत कोठारी बॅ. गाडगीळ हे जाऊन आम्हास आत सोडा असे तेथील स्वयं- सेवकांस म्हणू लागले. तेव्हा तुम्ही पुढच्या दरवाज्याने आत जा असे त्यास सांगण्यात आले. तरी त्यांचा आत सोडण्याबद्दल आग्रह सुरूच होता. परंतु स्वयं- सेवक त्यांस न वळल्याने ते बरोबरच्या घोळक्यासह मुख्य दाराकडे वळले. हे सर्व लोक दारातून तिकिटे न दाखविताच आत घुसणार असे पाहताच स्वयंसेवकानी दारात बाक ठेवून दरवाजा अडविला व तिकिटे दाखविणारासच फक्त सोडण्यात येईल असे वरील लोकांच्या पुढायास त्यानी स्पष्ट सांगितले. ते त्यांस मानवले नाही. इतक्यात जमावातून स्वयंसेवकांवर दगडांचा मारा सुरू झाला त्यात श्री. वजीरकर जानोरीकर गलगली वांगीकर मुरलीधर बळीरामदास इत्यादि गृहस्थास चांगल्याच जखमा झाल्या. पो. सु. मि. गुडी यानाहि दगडांचा मार बसला. हा सर्व प्रकार रॅ. परांजपे कामत कोठारी तेथे जवळच कारंज्याजवळ उभे राहून पहात होते. दंगेखोर अनावर झालेले पाहताच पोलिसानी काठी चालवून दंगा मोडला व परिषद नीटपणे सुरू झाली. " " कोठपर्यंत गेली होती हे दिसून व तक्रारीला जागा उरू नये म्हणून नमते घेऊन सामोपचाराचे धोरण वरील हकीकतीवरून नेमस्तांची मजल येईल. कोणत्याहि तऱ्हेचा घोटाळा होऊ नये अध्यक्ष व स्वागताध्यक्ष यानी होईल तितके ठेवले होते. पण अखेर हा प्रकार झालाच, परिषदेचे अध्यक्ष हे टिळकांचेच असल्यामुळे परिषद मोडली असता टिळकांच्या इभ्रतीला व वजनाला आपण धक्का दिला असे सिद्ध होईल हा नेमस्तांचा विचार उघड होता. पण तो साधला नाही. अशा रीतीने अमृतसरच्या राष्ट्रीय सभेची तिच्या खालोखाल ही दुसरी आवृत्ति चार महिन्यात निघाली. पण ती फुकट गेली. अमृतसरला आपल्या पक्षाला १०।१५ मते मिळाली त्यापेक्षा पुष्कळ अधिक बळ आपल्याला सोला- पुरास मिळाले, आणि हे बळ आणखी असेच वाढविले तर आपल्याला निवड- णुकीत यश येईल अशी त्यांची समजूत असावी. ही आशा व्यर्थ होती है त्या सालच्या निवडणुकी झाल्या असत्या तर दिसून आलेच असते. पण पुढे असहकारिता जन्मास आल्यामुळे राष्ट्रीयपक्ष निवडणुकीना उभाच राहिला नाही. तथापि असहकारिता हटून कौन्सिलप्रवेशाचे धोरण काँग्रेसने पुनः स्वीकारले तेव्हा तेथपासून झालेल्या दोन निवडणुकीत राष्ट्रीयपक्ष व नेमस्तपक्ष यांचे खरे बला- बल सिद्धच झाले. सोलापुराहून परत आल्यावर टिळकानी केसरीत तेथील प्रकारावर एक सणसणीत अग्रलेख लिहिला. त्यात ते लिहितात "परांजपे हे प्रिन्सिपाल होते, टि० उ...३५