पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ ताध्यक्षाशी असे बोलणे सुरू केले की आमच्या प्रतिनिधीना तिकिटे फुले मिळा- लेली नाहीत म्हणून आम्ही सांगतो त्या सर्व लोकाना आत घ्या किंवा सभा एक दिवस तहकूब ठेवा. सामंत म्हणाले की आज इतके दिवस परिषदेची कचेरी उघडी असता तुम्हाला तिकिटे मिळाली नाहीत यात आमचा काय दोष ? तरी तिकिटाऐवजी म्हणून गडबडीने ४०/५० चिठ्या सांगितलेल्या नावाच्या सामंत यानी कोठारीना दिल्या. तरी परांजपे व कामत यानी असा धाक घातला की तुम्ही सभा लांबणीवर टाकली नाही तर परिषदेचे काम तहकूब ठेवण्याविषयी आम्ही प्रारंभीच सूचना आणू. त्यावर सामंत म्हणाले ' तुम्हाला योग्य दिसेल ते करा.' तेव्हा परांजपे कामत यांच्या भोवती जमलेले त्यांचे लोक दटावून आम्हा सर्वाना आत सोडा असे म्हणू लागले. आणि पहिले वंदेमातरमचे पद चालू असताच ते आरडाओरड करून मंडपात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. बाहेर मैदानात चाललेली आरडाओरड ऐकून स्वयंसेवक बाहेरच्या दाराशीच बंदोब- स्ताला गेले व दाराशी त्यानी दोन तीन रांगा धरून घुसणाऱ्या लोकांना थांब विले. तसे झाले नसते तर हे सर्व लोक आत घुसल्याने मंडपातच दंगा व मारा- मारी झाली असती. पण परांजपे व कामत यानी स्वयंसेवकाशीच हुजत घाल- ण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने आत घुसण्याचा प्रयत्न निष्फळ झाला तेव्हा त्यानी मंडपाकडे दगड फेकण्यास सुरवात केली. ते पुष्कळाना लागले आणि वजि- रकर नावाच्या व्यापाऱ्याचे डोके फुटून रक्ताचे ओघळ तोंडावर येत आहेत अशा स्थितीत ते अध्यक्षाकडे आले. तेव्हा आतील लोकाना खरा प्रकार लक्षात आला. नंतर खुद्द कलेक्टर व पोलिस अधिकारी पुढे आले व त्यानी असा हुकूम केला की चिया तिकिटे असतील त्यानी मंडपात एकामागून एक जावे व नसतील त्यानी निघून जावे. तेव्हा परांजपे व कामत यानी निघून जाण्याचे ठरवून फिरून रात्री आपली सभा थिएटरात होणार आहे असे जाहीर केले. पण झाला दंगा हाच शेवटचा. दुसरे दिवशी सकाळपासून अधिकाऱ्यानी विशेष बंदो- बस्त ठेविला व परांजपे याना बोलावून आणून त्याना काही गोष्टी समजून सांगि- तल्या. त्यापुढे काही गडबड झाली नाही. यासंबंधाने खरा प्रकार काय झाला याविषयी काही लोकांच्या जबान्या घेण्यात आल्या त्यांचा निष्कर्ष पुढे दिला आहे. मवाळानी केलेली दंगल सोलापूर येथील प्रांतिक परिषदेचे वेळी मवाळ लोकानी गुंडांच्या सहा- य्याने परिषदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुंडानी मारामारी करून दगडफेकहि केली तीत बरेच इसम जखमी झाले. या दंगलीची प्रत्यक्ष पाहिलेली हकीकत व दगडांच्या माराने दुखापती झाल्या त्यानी आपल्या सह्यानिशी कळवि- लेली हकीकत त्यावेळी परिषदेच्या अधिकाऱ्याकडे दिली गेली तिचा संकलित वृत्तांत पुढीलप्रमाणे आहे.