पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सोलापुरची प्रांतिक परिषद ५६ मग काँग्रेसलाच तेवढे असे बंधन का असावे ? विलायतेत देखील असा प्रकार होतो. मुख्य प्रधान ॲस्किथ हा काही बुद्धिमत्तेने कमी नाही असे असता त्याचा पराभव होऊन त्यांच्याहून कमी योग्यतेचा कान्झरव्हेटिव्ह किंवा चुनियनिस्ट का निवडला जातो ?" शेवटी बेझन्टबाईच्या उपसूचनेला सुमारे ७०० आणि टिळकांच्या मूळ ठरावाला सुमारे दोन हजार मते पडली असावी असे अध्यक्षानी सांगून टिळकांचा ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. हा टिळक पक्षांचा मोठाच विजय होय. पण हा अंदाज करताना काही शंका राहू नये म्हणून अध्यक्षानी ना. परांजपे याना मुद्दाम जवळ बोलावून तुम्हीहि वाटेल तर वर उचललेले हात मोजा असे सांगितले व परांजपे यानीहि अध्यक्षानी दिलेला निकाल बरोबर आहे अशी कबुली दिली. अशा रीतीने हा मुख्य वादाचा प्रसंग पार पडला. व त्यात राष्ट्रीय पक्षाचे बहुमत सिद्ध झाले. नंतर इतर ठराव पास होऊन परिषदेचे काम सुमारे बारा वाजता निर्विघ्नपणे पार पडले. नेमस्त पक्षाने तीन महिन्यापासून विरोधाची तयारी सुरू केलेली असून पुणे जुन्नर बेळगाव व सातारा वगैरे ठिकाणी ती यापूर्वीच प्रगट केली होती. या प्रत्येक ठिकाणी मुख्य आक्षेप हा घेतला जात असे की टिळक सहभोजनाना जात नाहीत, विधवाविवाहासारखी सामाजिक सुधारणेची कार्ये ते करीत नाहीत, व ब्राह्मणेतर पक्षाला ते विरोध करतात. यापैकी काही आक्षेपाना टिळकानी पुण्याच्या सभेत व बेळगावच्या सभेत उत्तरे दिली होती. पण फिरून एकवार मोठा प्रयत्न करून पाहण्याचे ठरवून परांजपे यानी सोलापूर जिल्ह्यातीलच एक ब्राह्मणेतर पुढारी वालचंद कोठारी याना विरोधक सैन्याची भरती करण्यास पुढे पाठविले होते. त्यांच्यामागून कामत हेहि सोलापुरास गेले. सोलापुरास गिरणीमजूर कारखानदार वगैरे सरमिसळ बकाली वस्ती बरीच. आणि ब्राहाणेतर चळवळ त्या जिल्ह्यात पूर्वीच सुरू झाली होती. यामुळे आपल्याला शेकडो लोक मिळतील अशी उभयतांची समजूत होती. आणि या कामी पुणे व कोल्हापूर येथून पैशाची मदत करण्यात आली होती. कामत यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी यांचे एक व्याख्यान होऊन टिळकांच्या सर्व दोषांचा पाढा तेथे वाचण्यात आला होता. तथापि परिषदेत बहुमत मिळ- ण्याइतकी प्रतिनिधींची संख्या उभारता येत नाही असे पाहून त्यानी आगाऊ असेहि प्रसिद्ध केले होते की आमचा हेतू राष्ट्रीय सभेचे धोरण दुष्ट व विपरीत कसे आहे इतके दाखविण्याचाच आहे पण आम्ही स्वतः काही राष्ट्रीय सभेत जाऊन ते बदलून घेणार नाही. अखेर ७००/८०० लोकांची भरती कशी तरी करून परिषदेत दंगल करावी असे त्यानी ठरविले. परिषदेच्या पहिल्याच दिवशी ती सुरू होण्याच्या आधी तास दोत तास सर्व विरोधक पुढाऱ्यांची व त्यानी जमविलेल्या सैन्याची सभा जवळच्या थिएटरात भरून सर्वांनी मिळून एकदम मंडपात जाऊन घुसावे असे ठरविले. परांजपे व कामत यानी पुढे जाऊन स्वाग