पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५५ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ म्हणून जो ठराव टिळकपक्षीयानी मांडला तो असा होता की "जे उमेदवार अमृ- तसर काँग्रेसच्या ठरावाला अनुकूल असतील त्यानाच मतदारानी कायदेकौन्सि- लच्या पुढील निवडणुकीत निवडून द्यावे. " या ठरावाला विषय नियामक मंड- ळात वेळीच विरोध करण्यात येऊन तेथे तो मंजूर झाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी भरसभेत आपण त्याला उपसूचना आणणार आहोत अशी बेझंटबाईनी उपसूचना दिली होती. अशा रीतीने वादाचे क्षेत्र निश्चित झाले होते. हा ठराव पुढे येताच स्वतः स्वागताध्यक्ष सामंत व बार्शीचे वकील रामभाऊ साने यानी असला ठरावच मुळीं या परिषदेत आणता येत नाही अशी नियमाची म्हणून हरकत घेतली. तिला करंदीकर यानी विरोध केल्यावर असला ठराव पुढे आणणे कोणत्याहि नियमाना सोडून नाही असा निकाल अध्यक्षानी देऊन तो मांडण्या- विषयी टिळकाना निमंत्रण केले. तो मांडण्यापूर्वी अध्यक्षानी दुसरा एक ठराव औपचारिकरीत्या स्वतःच पुढे मांडला कारण तो वादग्रस्त नव्हता. तो ठराव असा होता की कलकच्याच्या कॉंग्रेसने अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीसंबंधाने जे धोरण स्वीकारले ते या परिषदेला मान्य आहे. नंतर टिळकानी मुख्य ठराव मांडून त्यावर भाषण केले. त्यात ते म्हणाले की " ही परिषद राष्ट्रीय सभेचाच एक भाग होय म्हणून राष्ट्रीय सभेने अमृतसर येथे मंजूर केलेला स्वराज्य विषयक ठराव या परिषदेला मान्य असलाच पाहिजे. अर्थात् तो ठराव व्यक्तिशः ज्याना मान्य असेल अशाच उमेदवाराना कौन्सिलात निवडून द्यावे, इतराना देऊ नये असे म्हणण्याचाहि अधिकार या परिषदेला आहे. याला चिंतामणराव वैद्य यानी अनु- मोदन दिले. नंतर बेझंटवाई यानी आपली उपसूचना मांडली. उपसूचनेचा आशय असा होता की कोणताहि पक्षभेद मनात न आणता जे लोक बुद्धिमत्तेने श्रेष्ठ काँग्रेसच्या सर्वसाधारण धोरणाला अनुकूल आणि जे सर- काराशी सहकारिता करून सुधारणाचा उपयोग करतील त्यानाच मतदारानी निवडून द्यावे. या उपसूचनेला ना. परांजपे यानी अनुमोदन दिले. हा ठराव व उप- सूचना यांच्यावर साधक बाधक बोलण्याकरिता अनेक वक्त्यांची नावे पुढे आली होती. त्यातून एक अनुकूल व एक प्रतिकूल बोलणारा अशा रीतीने व्यवस्था लावून, म्हणजे उत्तर प्रत्युत्तर रूपाने साधक बाधक चर्चा समर्पक व्हावी अशी, अध्यक्षानी मुद्दाम योजना करून ती जाहीर केली व सरसनिरस तारतम्याने एका- मागून एक वक्त्याना बोलाविले. यामुळे वादविवाद परिणामकारक झाला. भाषणे जोरदार व त्यात कोट्या प्रतिकोट्या वगैरे सुरू असल्यामुळे वादाला रंग बराच चढला होता. सर्व भाषणे झाल्यावर टिळकानी बेझन्टबाईना उत्तर दिले. ते म्हणाले " पक्षभेद राहू नये हे जर खरे तर अलाहाबादच्या नेमस्तसंघाने केवळ आपल्या उमेदवारांची यादी करून त्यानाच मते द्या इतराना देऊ नका अशी विनंति मतदारसंघाना का केली आहे ? तिचा तुम्ही कोणी निषेध केला आहे काय ? उद्या मुंबई इलाख्यातद्दि नेमस्तपक्ष आपलीहि अशीच यादी करणार.'