पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सोलापुरची प्रांतिक परिषद (१४) सोलापुरची प्रांतीक परिषद ५४ सोलापूरची मिरवणूक सुमारे तीन तास चालू होती. या मिरवणुकीतच विरोधाचे पूर्वचिन्ह दिसून आले. कारण एक हस्तपत्रक मिरवणुकीत मधून मधून वाटण्यात येत होते. त्यात असे लिहिले होते की 'गांधी परिषदेस येत नाहीत. मिरवणूक कोणाची काढता १' पण लोक हस्तपत्रक हातात घेत वाचीत हंसत व हाताने चुरगळून फेकून देत. सायंकाळी चार वाजता परिषदेला सुरवात झाली. प्रतिनिधींची संख्या सुमारे बावीसशे असून प्रेक्षकहि सुमारे दोन हजार होते. दोनतीनशे स्त्रियाहि होत्या. प्रथम गायन वगैरे झाल्यावर श्रीशंकराचार्य कुर्तकोटी हे परिषदेला आले होते त्यानी आशीर्वाद दिला. नंतर निरनिराळ्या प्रांतातील हिंदुमुसलमान पुढाऱ्याकडून आलेले संदेश वाचून दाखविण्यात आले. स्वागत- सभेचे अध्यक्ष सामंतवकील यानी आपले भाषण वाचून दाखविल्यावर अध्य- क्षांची निवडणूक झाली. सामंत यांचे भाषण चालू असता दंग्याला थोडीथोडी सुरवात झाली होती. अध्यक्षानी आपले भाषण इंग्रजीत वाचून दाखविले. नंतर त्याचा तर्जुमा गंगाधरराव देशपांडे यानी मोठ्या खणखणीत आवाजाने वाचून दाखविला. नंतर विषयमंडळ निवडण्यात येऊन पहिल्या दिवसाचे काम संपले. सोलापुरात चाललेली ही गडबड कळून आल्यामुळे रात्री टिळकानी मुद्दाम जाहीर व्याख्यान ठरविले होते. खापर्डे यानी मुख्य भाषण केले. परंतु या समेत प्रत्यक्ष गडबड काही झाली नाही. फक्त बाहेरून बाहेरून भुरटेपणाची थोडी थोडी गडबड झाली. पण राष्ट्रीयपक्षाचे बल किती व इतर संयुक्तपक्षांचे बल किती हे एकदा कळूनच यावे म्हणून सोलापूरच्या मुक्कामात रोज रात्री जाहीर व्याख्याने ठेवण्यात आली होती. आणि त्यात राष्ट्रीयपक्षाचे निर- निराळे पुढारी भाषणे करीत असत. या व्याख्यानमालेत खापर्डे गंगाधरराव देश- पांडे लक्ष्मणराव भोपटकर चिंतामणराव वैद्य शिवरामपंत परांजपे डॉ. सावरकर वगैरे नामांकित वक्ते बोलणार असे आगाऊ जाहीर होत असे यामुळे सभाना खूपच गर्दी लोटे. आपले बल नेमस्तपक्षाला दाखवावयाचे तर त्यानाद्दि अशा जाहीरसभा भरविण्याला कोणी हरकत केली नव्हती. पण त्यानी तशा सभा मुळीच केल्या नाहीत. परिषदेच्या तिसन्या दिवशी सकाळी आठ वाजता फिरून कामाला सुरवात झाली तेव्हा स्वराज्य विषयक मुख्य ठराव पुढे यावयाचा होता व तो मुख्य युद्धाचा दिवस असे जाणून गर्दी फार झाली होती. आदल्या एक दोन दिवस गडबड दंगल व मारामारीहि झालेली असल्यामुळे या दिवशी पोलिसानी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता आणि नाक्यानाक्यावर चौक्या ठेवून परिषदेच्या बाहेरच्या अंगाला तंबूत डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व स्वतः पोलिस सुपरिंटेंडेंट हे हजर होते. परंतु गर्दी मारामारी काय व्हावयाची ती पूर्वीच होऊन गेली होती व या दिवशी कामाला काही व्यत्यय आला नाही. वादग्रस्त