पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ १९१४-१९१५ सालांतील निवडक पत्रे परिशिष्ट १ [ १९१४-१९१५ मधील निवडक पत्रे ] (१) अश्विनीकुमार दत्त यांचे केळकराना पत्र शेवणी सि. पी. १५ फेब्रुवारी १९१४ ३७ तुमच्या पत्नावरून टिळक लवकरच सुटणार असे दिसते. त्याना कैद झाल्याला किती तरी वर्षे झाली ! म्हणून ते सुखरूप परत यावेत अशी प्रार्थना आहे. याहि खेपेस तुरुंगांतून सुटून आल्यावर एखादा ग्रंथ जो जगात अमर राहील असा ते निर्माण करतील अशी मला फार आशा आहे. ना. गोखले यांची तब्येत कशी आहे तेहि कळवावे. (२) हरि गणेश फाटक यांचे केळकराना पत्र फोंडा गोवा ४ मार्च १९१४ आमच्या कॉलेजचे डायरेक्टर व प्रोफेसर यांचे फोटो तुम्हाला नजर म्हणून पाठवीत आहे. तुमच्याविषयी असणाऱ्या अत्यंत खोल आदरबुद्धीची ती खूण म्हणून पाठवीत आहे. महाराष्ट्र वाचकवर्गाला जिव्हाळ्याच्या राजकीय विषयावर शिक्षण देण्याची जी सेवा तुम्ही केली त्याबद्दल तुमचे गुण घ्यावे तितके थोडे आहेत. हल्ली दडपशाही व शिक्षासत्र यांचा धूमधडाका सुरू आहे. अशा वेळी तुम्ही नसता तर केसरीपुढे मोठा चिकट प्रश्न येऊन पडला असता. तुमच्यामुळेच केसरी प्रेस अॅक्टाच्या जाळ्यांतून बचावला. महाराष्ट्राला ही गोष्ट कबूल केली पाहिजे. तुमच्यावर कामकाजाचा ताण फार पडला यात शंका नाही व आमच्या राष्ट्रीयपक्षाच्या मंडळीपैकी तुम्ही म्हणूनच तो सोसला व त्यांतून यश मिळवून बाहेर पडला. आतां टिळक लवकरच सुटतील आणि तसे झाले म्हणजे हा ताण तुमचा थोडासा तरी कमी होईल व तुम्हाला थोडी विश्रांति मिळेल. तुमच्या स्वार्थत्यागपूर्वक परिश्रमाने अशी विश्रांति घेण्याचा हक्कच तुम्ही मिळविला आहे. (३) सत्येंद्र बोस यांचे केळकराना पत्र कलकत्ता १० मार्च १९१४ साताऱ्याच्या सभेनंतर मी सुबराव याना लिहिले व समेट करण्याबद्दल तुमच्या सूचना काय आहेत त्या पाठवा असे त्यानी मला लिहिले आहे. साता- रच्या सभेने घटनेतील प्रतिज्ञालेख मान्य करणाऱ्या लोकांना जाहीर सभानी निव- डले तरी घ्यावे असे ठरविले आहे. एकंदर राष्ट्रीयपक्ष ही सूचना मान्य करील काय ? बाबू मोतिलाल घोस हे ह्मणतात की १९०६ च्या काँग्रेसचे सर्व ठराव.