पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ साधून टिळकाना पानसुपारी केली ती घेऊन टिळक अजमीर येथील लोकांच्या निमंत्रणावरून तिकडे गेले. दिल्लीहून दादासाहेब खापर्डे व विठ्ठलभाई पटेल यानाहि त्यानी बरोबर घेतले होते. ता. २४ रोजी अजमीरचा सत्कारसमारंभ मोठ्या थाटाने झाला. जागजागी कमानी तोरणे उभारली होती. बाजार पेठेतील जरतारीच्या हिंदु व्यापाऱ्यानी सोनेरुपेरी फुले करून उधळली. मुसलमान पुढा- यानी तेथील पुरातन मशिदीत टिळकाना बोलावून पानसुपारी केली. सायंकाळी मानपत्र समारंभ झाला. हा समारंभ आटपताच विश्रांति न घेता सिंघमधील दौरा उरकण्याकरिता अजमीरहून टिळक परस्पर सिंधकडे वळले. ता. २६ रोजी ते सिंध-हैद्राबाद येथे पोचले. स्टेशनावरून दारूचे बार उडवीत व नौबती वाजवीत मिरवणूक निघाली. तेथील नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले स्वयंसेवक दल तयार करून सर्व व्यवस्था ठेवली होती. बिनघोड्याच्या गाडीतून त्यांची मुख्य मुख्य रस्त्यानी मिरवणूक नेण्यात आली व अनेक लोकानी वाटेत लहान लहान देणग्या दिल्या. शिकारपूर येथे हिंदी स्वराज्य संघ खिलाफत कमिटी वगैरे संस्थानी मानपत्रे दिली व नागरिकातर्फे सहा हजार रुपयांची थैली देण्यात आली. सक्कर येथे हि मानपत्र देण्यात आले. येथे एक व्याख्यान तिकिटे लावून केले त्याचे उत्पन्न तीन हजार रुपये झाले ते जालियनयाला फंडाला देण्यात आले. ता. २९ रोजी कराची येथेहि अशीच मोठी मिरवणूक निघाली. गाडीत हिंदुमुसलमान पुढारी बसले असून बाजूला हिंदुमुसलमान स्वयंसेवक उभे राहून त्यानी कलाचतूच्या सोनेरी छत्र्या धरल्या होत्या. गाडीवर हिंदू व मुसलमान यांची निशाणे लावली होती. सिंध मद्रेसातील मुसलमान विद्यार्थी कापड मार्केटातील व्यापारी स्वदेशी स्टोअर्स वगैरे संस्थानी व लोकानी हार घातले. सायंकाळी सिंध स्टूडंड्स कनव्हे- शनतर्फे व्याख्यान झाल्यावर काँग्रेस कमिटी मुस्लिम लीग होमरूल लीग वगैरेनी मानपत्रे दिली व रात्री उपहार समारंभ झाल्यावर चौदाशे रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. नंतर वाटेत मिरपुरखास तांडोजा कोटी वगैरे ठिकाणी थोडथोड्या वेळात असेच स्वागत समारंभ झाले. ता. ३० रोजी टिळक परत हैद्राबादला आले आणि तेथून जे निघाले ते थेट मुंबईला येऊन पुण्यास न उतरता एकदम सोलापुरास येऊन दाखल झाले. केळकर वगैरे लोक आधीच एक दिवस सोलापुरास जाऊन पोचले होते. विरोधक पक्षाचे पुढारीहि एक दिवस आधी येऊन टिळक केळकराना परिषदेत कसकसा विरोध करा- वयाचा याची तयारी त्यानी जोराने चालविली. नेमस्तांचे बहुतेक पुढारी रॅ. परांजपे व कामत यांच्यासह हजर होते. बेझंटबाई या आपली अनुयायी मंडळी घेऊन हजर होत्या. कारण त्यांचा व टिळकांचा नुकताच वर्तमानपत्रातून कडाक्याचा वाद झाला होता व बाईना मुद्दाम मद्रासेहून आणविण्यात आले होते.