पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ विकच होता. परिषद सोडून दिली तर एरव्ही ज्या अनेक सभा जुन्नरास टिळकांच्या मुक्कामात झाल्या त्याला कधी कोणी तिकिट ठेवले होते ? आणि त्यांची भाषणे ऐकावयाला जमणाऱ्या गर्दीत बहुधा शेतकरीच असत. असो. अशा रीतीने डाळ न शिजल्याने नेमस्त पुढाऱ्यानी मंडपाबाहेरच जमून इकडले तिक- डले चाळीस पन्नास लोक घेऊन समोरच एका वडाच्या झाडाखाली सभा भर- विली. आणि मोठमोठ्याने भाषणे व गोंगाट होईल तितका केला. पण बातमी- दार लिहितो " वडाखालील किंवा वडावरील कावळ्यांच्या कलकलाटानी जिल्हा सभेच्या कामात मुळींच व्यत्यय आला नाही. " शेवटी मजल येथपर्यंत गेली की जमलेल्या या लोकानी ते दिवस शिमग्याचे असे पाहून शिमग्यातील सर्व प्रकार टिळकांच्या नावाने तेथे केले. वाईट इतकेच की त्यात प्रो. कानिटकर ना. कामत गोखले वकील रँग्लर परांजपे व काळे होते की नाही माही नाहीत असे लोकहि या तमाशावाईक प्रकरणात सामील होते. या लोकाना कदाचित् असे वाटले असेल की टिळकच एकटे कोण तेल्या तांबोळ्यांचे पुढारी होणार ? म्हणून हुल्लड करून हा एक अनुभव त्यानी घेऊन पाहिला असावा. तेथे काय प्रकार झाले याची वर्णने परस्पर नेमस्त पत्रातूनच आलेली आहेत. पण एकंदरीने जिल्हा परिषद उधळून देण्याचे त्यांचे प्रयत्न फुकट गेले. हजर असलेल्या काही लोकाकडून सुधारणाना दूषण देणारे शब्द ठरावातून काढून टाकावे असाहि विषय नियामक मंडळात प्रयत्न झाला पण तेथेहि काही साधले नाही. या सगळ्याच्या बुडाशी एक मर्माची गोष्ट होती ती ही की यापुढे लौकरच निवडणुकी होणार होत्या नेमस्त पुढारी उमेदवार म्हणून उभे राहणार होते आणि मतदारी उदार हस्ताने वाटण्यात आलेली असल्यामुळे आता तेली तांबोळी हेच मतदार म्हणून स्वराज्याचे धनी एकदम होऊन बसले होते तेव्हा या लोकात मिसळले तर निवड- णुकीत मदत होईल हे या हुल्लडीतील सर्व बीज होते. जुन्नरास काही हस्तपत्रके वाटण्यात आली. त्यात असे लिहिले होते की सरकारने ज्या सुधारणा दिल्या आहेत त्यांचा अपमान करणे हा उपद्व्यापीपणा आहे म्हणजे एका अर्थी तो सर- कारचाच अपमान आहे. शिवाय कोल्हापुरातील एका अमेरिकन बाईने इंग्रजी राज्यकारभाराला दिलेली सर्टिफिकिटेंहि काही त्या हस्तपत्रकात छापली होती. यावरून असे दिसते की काही सरकारी लोक काही जुन्नरच्या बाजूचे मिशनरी लोक काही नेमस्त काही ब्राह्मणेतर व काही गावगुंड अशांचा हा पंचमेळ चिवडा बनला होता. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. बेळगाव येथील तिसरी जिल्हा परिषद बापुजी अणे यांच्या अध्यक्षतेखाली ता. ५ रोजी बेळगावास भरली. तेथेहि नेमस्तांचे व ब्राह्मणेतरांचे पुढारी यानी मिळून सुधा- रणानिंदक शब्द काढून टाकावे अशी उपसूचना आणली पण तिला अवधी सहा मते मिळाली. याहि परिषदेला टिळक गेले होते व तेथे संकेश्वर व हुकेरी तालु- क्यातर्फे टिळकाना मानपत्रे देण्यात आली त्यावेळी प्रत्येक जातीच्या पुढाऱ्यानी