पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ जुन्नरची जिल्हा सभा 'लक्ष न देता स्वतःचे कर्तव्य केले पाहिजे हे माझ्या उपदेशाचे सार होते. पण त्याचा श्रोत्यावर मुळीच परिणाम झालेला दिसत नाही. तुम्ही संख्येने इतके लोक असता यः कश्चित् सर्पाची हूल उठताच जीव बचावण्याकरिता वाट मिळेल तिकडे पळत सुटलात. तुम्हासारखे सामान्य लोक मोहामुळे रज्जूलाच सर्प मानितात. तो मोह घालविण्याकरिताच वेदान्ताचा अवतार आहे. वेदान्ताचे तत्त्व ज्याच्या मनावर बिंबले आहे त्याच्या ठायी इतका आत्मविश्वास उत्पन्न होतो की तो सर्पा- • लाच रज्जूप्रमाणे पिरगाळून टाकितो तसा आत्मविश्वास व पराक्रम तुम्हामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. ( १२ ) जुन्नरची जिल्हा सभा डिसेंबर १९१८ मध्ये पुणे जिल्हा परिषद लोणावळा येथे भरली त्यानंतर ती मार्च महिन्यात जुन्नर येथे भरवावी असे ठरले होते. प्रतिनिधी व स्वागत सभेचे सभासद मिळून सुमारे पाचशे लोक जमले होते. प्रथम बागाईतकर वकील यांचे स्वागता- ध्यक्ष म्हणून भाषण झाल्यावर अध्यक्ष गंगाधरराव देशपांडे यानी भाषण केले. त्यात त्यानी सांगितले की "यावेळी आपणाला इष्ट स्थिति प्राप्त झाली आहे म्हणून सुधारणांचा जो उरलेला भाग आपणाला मिळालेला नाही त्याविषयी नेटाने मागणी केली पाहिजे. हिंदुस्थानात आज सुमारे पन्नास लाख लोकांना मतदारीचा हक्क मिळाला आहे त्याचा पूर्ण फायदा घेऊन योग्य ते प्रतिनिधी कौन्सिलात निवडून दिले पाहिजेत. यात जात किंवा धर्म किंवा पंथ याना महत्त्व नाही." संध्याकाळी फिरून सभेच्या कामाला सुरवात झाली व गोवधाची बंदी मुस्लिमलीगने स्वीका- कारल्याप्रमाणे करावी मुळशी पेट्यातील टाटा यांच्या धरणाला सरकारने संमति देऊ नये वगैरे अनेक ठराव झाले. व दुसरे दिवशी ता.४ रोजी इतर ठराव होऊन सभेचे काम संपले. ता. ३ रोजी परिषदेच्या मंडपात टिळकांचे व्याख्यान झाल्यावर जुन्नर 'म्युनिसिपालिटीने टिळकाना मानपत्र दिले. अशा रीतीने प्रत्यक्ष परिषद पार पडली. परंतु जुन्नरासहि नेमस्त व ब्राह्मणेतर यानी टिळकाना विरोध करण्याचा कसून प्रयत्न केला. प्रथम नेमस्तातर्फे ना. कामत यानी अशी भागणी केली की शेतकरी लोकांचे म्हणून काही प्रतिनिधी परिषदेला घ्या. याचा सरळ अर्थ असा होता की आम्ही काही दंगेखोर लोक तयार करून आणले आहेत त्याना आमच्या बरोबर बसू द्या आमच्या मतांची संख्या फुगवू द्या आणि वेळी दंगा करण्याला मदत करू द्या. पण हा भोळाभाव सिद्धीला कोण जाऊ देणार? शेतकन्याना . प्रतिनिधी होण्याला शेतकरी म्हणून कोणी मना केले नव्हते. शिवाय मंडप भरावा तो रिकामा राहू नये अशी कोठेहि सभा भरविणाऱ्या चालकांची दृष्टि सहजच असते त्याप्रमाणे ते सन्मानार्थी म्हणजे फुकट तिकिटे देऊन जे येरव्ही प्रतिनिधी झाले नसते त्याना प्रतिनिधी करितात. असे असता या नेमस्त पुढाऱ्याला . आयत्या वेळी शेतकऱ्यांची एवढी कळकळ कोठून आली ? असा प्रश्न स्वाभा