पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ वेद स वेद यज्ञान् । ' असे प्रत्यक्ष वेदांगज्योतिषातच सांगितलेले आहे त्याचा विचार करा. "ज्योतिषानी एकी केली व दुसरी पंचांगे काढलीच नाहीत म्हणजे सर्वत्र शुद्ध पंचांग अमलात येण्यास क्षणाचाही उशीर लागणार नाही. सर्व समाजाचा विश्वास व भरंवसा तुमच्यावर आहे. तरी त्याना योग्य मार्ग दाखवा व आपणा- पुढे असलेल्या प्रश्नाचा योग्य निकाल लावून संमेलनाचे कार्य यशस्वी करा. " टिळकांच्या भाषणाचे वेळी एक अकल्पित प्रकार झाला त्याचे वर्णन संमे- लनाचे अध्यक्ष श्री. कृ. कोल्हटकर यानी खालीलप्रमाणे दिले आहे:-- " भाषण चालू असताच जो एक विलक्षण प्रकार घडला त्यामुळे लोक- मान्यांचे स्वभाववैशिष्ट्य विशेष उठावाने दिसून आले. तो प्रकार असा. श्रोत्यांच्या रांगापैकी मागील काही रांगा एकदम उठल्या व काही गडबड न करता ओट्या- कडे धूम पळत सुटल्या. त्यांच्या पावलामुळे जी धूळ उडाली ती धुरासारखी दिसं लागली. लागलीच 'मंडपात आग' अशी ओरड सुरू झाली. पण ती पुढे निराधार ठरली. श्रोत्यांचे पळणे चालू होतेच. त्यांचे पाहून पुढील रांगातील श्रोतेहि ओय्या- कडे पळत सुटले, मी ओट्यावर बसलो होतो. श्रोत्यांच्या विलक्षण कृत्याचा उमज आम्हांपैकी एकासहि पटेना. हे हजारो लोक ओट्यावर डोकी आपटून कपाळमोक्ष करून घेणार की काय ? बरे असा कपाळमोक्ष करून घेण्याचे कारण तरी काय ? यांजवर कोणी हिंस्र पशू तर सोडले नाहीत ? मागाहून कोणी गोळी- बार केला म्हणावे तर चोहोकडे सामसूम आहे. अशा विचाराचे काहूर प्रत्ये- काच्या चित्तात उठले. पटागणांतील श्रोते पळत पळत ओट्याजवळ आले तेव्हा ओट्यावरील मंडळीही उठली व चोहोकडे एकच गोंधळ सुरू झाला. श्री. छाप- खाने यानी स्थिरस्थावर करण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यास बराच वेळ पावेतो यश आले नाही. श्रोत्यापैकी बरेचजण घरोघर निघून गेले. बाकीच्या श्रोत्याना श्री. छापखान्यानी 'तुमचा धि:कार असो ! आपले सन्मान्य पाहुणे येथे बसले असता तुम्ही पळून जाणे लाजिरवाणे आहे. आपल्या गावची अब्रू बचा- वावयाची असेल तर येथेच बसून रहा.' असे ओरडून परोपरीने सांगितले. अखे रीस अर्ध्या पाऊण तासाने सभेत पुन्हा शांतता झाली. या प्रकाराच्या मुळाशी गावातील विरुद्धपक्षीय मंडळी असली पाहिजे असा श्री. छापखान्यांस संशय आला होता. पण आगीच्या हुलीप्रमाणे तोही निराधार ठरला. चौकशीअंती असे बाहेर आले की एका मुसलमान श्रोत्यास आपल्या कपड्यात साप आल्याचा भास झाल्यावरून त्याने 'साप ! साप !' अशी ओरड केली व तिचे पर्यवसान श्रोत्यांच्या पळापळीत झाले. " श्रीप्रमाणे लोकमान्यही आपल्या स्थानावर बसून राहिले होते त्यानी घड- •लेल्या प्रकारावर जे भाषण केले ते अत्यंत समयोचित व हृदयस्पर्शी झाले. ते म्हणाले ' आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय कर्मयोग हा होता. परिणामाकडे