पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सांगलीचे ज्योतिष संमेलन ४८ ८८ आपणास असे वाटत असेल की, शुद्ध-पंचांग प्रचारात आणले म्हणजे हा प्रश्न मिटला. परंतु खरोखरी तसे नाही. माझी इच्छा अशी आहे की, आपले हिंदी पंचांग इंग्रजी नॉटिकलप्रमाणे नौका- गमनालाही उपयोगी पडावे, येथ- पर्यंत त्याची प्रगति झाली पाहिजे; आणि हाप्रसंग लवकरच येणार याबद्दल शंका नाही. हिंदुस्थानातहि वेधशाळा होतील. युरोपियन देशाप्रमाणेच हिंदी वेध- शाळेची उच्च प्रगति घडणे शक्य आहे. आपण आपल्या ज्योतिषशास्त्राची प्रगति इतकी केली पाहिजे की वेधशाळा स्थापून त्या वेधशाळेमार्फत सूक्ष्म पंचांग निघाले पाहिजे. हिंदी वेधशाळेतून निघणारे पंचांगच सर्वत्र वापरले जाईल, यात केव्हाह शंका नाही. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, हा प्रश्न नुसत्या शुद्ध- पंचांगप्रवर्तनाने संपत नाही. तर त्याची शेवटची पायरी वैधज्ञान वेधशाळा हिंदी वेधवेत्ते व त्या वेधशाळेमार्फत निघणारे सूक्ष्म आणि शुद्ध पंचांग अशी ही चतुःसूत्री आहे. येथपर्यंत प्रगति झाल्याखेरीज हा प्रश्न मिटला असे कधीहि समजू नका. "दोष सर्वात आहेत. दोष दाखविणे आणि ते सुधारणे याचेच नाव प्रगति आणि अशीच प्रगति पंचांगसंशोधनाच्या बाबतीत सध्या करण्यात येत आहे हे आपण लक्षात ठेवा. वेळ अशी आली आहे की, पंचांगशुद्धीचे कार्य अवघ्या ४|५ वर्षात पूर्णत्वास पोचेल. करणग्रंथ लवकरच तयार होईल; आणि करण- ग्रंथासंबंधी ज्योतिषी लोकाना भासत असलेली व सर्वांनी कळविलेली अडचण व गैरसोय नाहीशी होईल. सत्य पक्षाकडे आपण जात आहो. अखेर सत्याचाच विजय होईल यात तिलप्राय शंका नाही. " वेधशाळेबद्दल मी पूर्वी प्रयत्न केला होता. रा. ब. केरूनाना छत्रे यांच्या स्मारकाप्रीत्यर्थ येथे वेधशाळा करावी असा माझा उद्देश होता. त्या बाबतीत मी एका प्रमुख साहेबास भेटलो असता त्याने असे सांगितले की येथेच वेधशाळा कशाला ? ग्रीनवीचला आहेच. त्या वेळची परिस्थिति प्रतिकूल असल्याने तो प्रश्न तितकाच राहिला. तथापि आता फिरून या गोष्टी तडीस नेण्याकरिता आपण प्रयत्न केला पाहिजे. "शुद्ध गणिताचा स्वीकार केल्यास धर्मशास्त्राशी विरोध येईल असे कित्ये- काना वाटते. परंतु तसे होण्याचे बिलकूल कारण नाही. धर्मशास्त्री लोकानी सर्वानुमते निर्णय करून दिल्यास व त्या गोष्टीस श्रीजगद्गुरूंची संमति मिळ. विल्यास हा प्रश्न सुटणे अशक्य नाही. आणि अशाच प्रकारे तो सोडविला पाहिजे. वेदामध्ये ही तडजोड आहे. आपण तडजोड करण्यास नाकबूल होणे - म्हणजे वेदांचा उपमर्द करण्यासारखे आहे. 'यथा शिखा मयूराणां नागानाम् मणयो यथा । तद्वद्वेदांगशास्त्राणां ज्योतिषं मूर्धनि स्थितम् || वेदा हि यज्ञार्थमभि- प्रवृत्ताः कालानुपूर्वा विहिताश्च यज्ञाः । तस्मादिदं कालविधानशास्त्रं यो ज्योतिषं