पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ केल्याचे श्रेय आपणास मिळेल आणि ज्योतिषशास्त्राच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. "भारतीय ज्योतिषग्रंथकाराबद्दल आदर व अभिमान बाळगणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. असा अभिमान बाळगल्याबद्दल मला केव्हाही आनं- दच वाटेल. परंतु त्या अभिमानात दुराग्रहास थारा देता कामा नये. अभिमान आणि दुराग्रह यांच्या झगड्यात अभिमान एका बाजूस राहून दुराग्रहच बळावतो आणि मग मनुष्य दुराग्रहाचेच समर्थन करू लागतो. तेव्हा असला दुराग्रह धरू नका. नवीन उपलब्ध झालेल्या माहितीचा उपयोग करून घ्या, आणि आपणापुढे असलेल्या प्रश्नाचा विचारपूर्वक निर्णय करा. आज आपणापुढे आलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आरंभस्थान आणि अयनांश असे दोन प्रश्न नसून खरो- खरी तो एकच प्रश्न आहे. आरंभस्थानाचा निर्णय झाला, म्हणजे अयनांश आपोआपच ठरतात. निरयन पंचांगाला स्थिर आरंभस्थान धरणे अत्यंत जरूर आहे. आरंभस्थान केव्हाहि स्थिरच पाहिजे. शके ४०० व ५०० च्या दरम्यान रेवती योगतारा आरंभस्थानी धरण्यात आला. त्यानंतर आजपर्यंत तोच कायम आहे. राशी मागाहून आल्या. वेदांग ज्योतिष्यात राशि नाहीत, आरंभस्थान रेवतीबिंदूपासूनच धरले आहे. रेवतीपासून संपातापर्यंतचे अंतर म्हणजेच अयनांश. हे अयनांश म्हणजे संमेलनाच्या प्रगतीची पायरी आहे. मुंबईचे संमेलनात २२ व २३ च्या दरम्यान अयनांश धरावे असा ठराव झाला. त्यानंतर पुण्यास सर्वा- नुमते अयनांश मुक्रर करून आणखी एक पायरी आम्ही पुढे गेलो. आज त्याच्यापुढे जाण्याचा विचार चालू आहे. कोणत्याहि गोष्टींचे असे आहे की, चूक लोकांच्या ध्यानात आली पाहिजे. लोकाना चूक पटली म्हणजे आपोआपच ते सुधारणा करण्यास कबूल होतात एरव्ही कबूल करीत नाहीत. आता सर्वाना जुन्या पंचांगात फरक पडतो ही गोष्ट पटली आहे. आणि म्हणूनच सर्व लोक शुद्ध पंचांग वापरण्यास अनुकूल झाले आहेत. ही संधि आपण गमावता कामा नये. नाही तर याचा दोष सर्वस्वी तुमच्यावर येईल. “अयनांशाबद्दलच बोलावयाचे असेल तर अयनांशाची पीछेहाट व ज्योति- षशास्त्राची शुद्ध पंचांगांची वाढ असा हा आजपर्यंतच्या प्रयत्नांचा अन्योन्य संबंध आहे. अशाच क्रमाने आपणास आरंभस्थानापासून येणाऱ्या अयनांशापर्यंत जावयाचे आहे. आणि तेथपर्यंत आम्ही जाणार. आज आपण जी व्यवस्था कराल ती कायमची करा, म्हणजे त्याबद्दल पुनः पुनः वादविवादाचे कारण रहणार नाही. "कोणत्याही गोष्टीचा निर्णय करताना आणि कार्य करताना आग्रह सुटावा लागतो. दुराग्रह उपयोगी नाही. ज्याचा दुराग्रह सुटत नाही त्याच्या हातून कोणतेच कार्य घडणे शक्य नाही. सर्वांना बरोबर घेऊन समजूत घालून, खरी परिस्थिति लक्षात आणून देऊन सर्वानुमतेच कोणतेहि काम केले पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवूनच मुंबई-पुण्याच्या संमेलनातील ठराव केले आहेत.