पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सांगलीचे ज्योतिष संमेलन ४६ स्वीकारावेत. हे ठराव बहुमतानेच मान्य झाले. त्याना काही ज्योतिषांचा विरोध होता. पण मुंबई पुणे व सांगली या तीन ठिकाणी ज्योतिषसंमेलने भरवून ज्योतिषी लोकाना पंचांग शोधनाचे काम पटवून करणग्रंथ तयार करण्यापर्यंत टिळकानी हे कार्य येथपर्यंत आणिले. करणग्रंथ अद्यापि व्हावयाचा होता. तथापि इतर साधनांवरून तयार केलेले नवीन पंचांग सुरू करण्याची खटपट आधीच झाली होती. आणि विलायतेस जाण्यापूर्वी टिळकानी जी अनेक कार्ये केली त्यांतच शुद्धपंचांग सुरू करावे व लोकानी ते मानावे असा आपल्या सहीचा लेखी संदेश त्यानी लिहून ठेऊन दिला होता ! या संमेलनात टिळकानी अखेरचे भाषण केले ते थोडक्यात खाली दिले आहे. "शुद्ध पंचांगविषयक चळवळ सुरू होऊन जवळजवळ ५० वर्षे झाली. ज्या वेळी ही चळवळ सुरू झाली, त्या वेळची परिस्थिति व समाजाची मनोवृत्ति फार निराळी होती. त्या वेळी ग्रहलाघवावरून करण्यात येणाऱ्या पंचांगात फरक पडतो, असे म्हणणे देखील समाजाला सहन होत नव्हते. असे म्हणणारावर सर्वांचा भयं- कर रोष होत असे. येवढेच नव्हे, तर कित्येक वेळा शुद्ध पंचांगाची चळवळ करणाराशी समाजातील लोक संबंध ठेवण्याचेही टाळीत ४० वर्षापूर्वी, पंचांग सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे धर्माशी व शास्त्राशी विरोध करण्याची चळवळ अशा प्रकारची समजूत झाली होती. त्या वेळी ज्योतिषीच नव्हे तर सामान्य जनसमूहही पंचांगशोधनाच्या विरुद्ध होता. ती स्थिति आता पालटली असून सर्वांना शुद्ध पंचागाची आवश्यकता जाणवू लागली आहे. आणि त्याच गोष्टीचा विचार कर- ण्याकरिता आपण सर्वजण येथे जमलो आहो. या कार्याकरिता शके १८२६ साली मुंबईस सबंध हिंदुस्थानातील ज्योतिषाचे संमेलन भरले होते. त्यात सर्व ठिकाणचे प्रमुख ज्योतिषी व धर्मशास्त्री हजर असून श्रीशंकराचार्य अध्यक्ष होते. संमेलन सुमारे १०/११ दिवस चालले होते. ७-८ दिवस झाले तरी संमेलनात एकवा- क्यता होण्याचा रंग दिसेना. मग पुढे प्रत्येक पक्षाच्या प्रमुख पुढाऱ्याशी वाटा- घाट करून निर्णय करावा लागला. त्याकरिताच निव्वळ तीन दिवस गेले. परंतु समाधानाची गोष्ट ही की, अखेरीस सर्वानुमते ठराव करण्यात आले. आणि अय- नांश २२ व २३ यांच्या दरम्यान धरावे असा ठराव पास झाला. "मुंबईच्या संमेलनानंतर पुणे येथे ज्योतिषसंमेलन भरले त्यातहि मुंबईच्या संमेलनाच्या ठरायाशी शक्य तितकी एकवाक्यता रहावी अशाच प्रकारचे ठराव झाले. पुण्याचे संमेलन झाल्यापासून हा प्रश्न एकसारखा लोकापुढे आहे. आमचा कोणत्याही प्रकारचा हट्ट नाही परंतु आमची इच्छा मात्र अशी आहे की पंचां गातील दुही कायमची नाहीशी व्हावी व सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व हिंदुस्था- नात एकमुखी पंचांग प्रचारात यावे. ही गोष्ट आपल्या हातातील आहे. आपण सर्वजण जर हट्ट आणि दुराग्रह सोडून देऊन एकमुखी शुद्ध पंचांग प्रचारात आणण्याचा प्रयत्न कराल तर त्यापासून ज्योतिषशास्त्राच्या उत्कर्षाला साहाय्य