पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५ लो० टिळकांचे चरित्र (११) सांगलीचे ज्योतिष संमेलन भाग ६ ता. १४ फेब्रुवारी रोजी टिळक सांगली येथे भरणान्या तिसऱ्या ज्योतिष संमेलनाकरिता पुण्याहून निघाले. बरोबर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे होते. वाटेत मिरज स्टेशनावर नागरिकानी त्यांचे स्वागत केले मिरवणूक काढली व काही वेळ मिरज शहरात नेऊन लगेच सांगलीस पोच- विले. या लहानशा मुक्कामात मिरजेस त्यानी स्वराज्य या विषयावर व्याख्यान दिले. ता. १५ रोजी रात्री संमेलनाच्या मंडपात श्रीशंकराचार्य ( डॉ. कुर्तकोटी) यांच्या अध्यक्षतेखाली टिळकांचे व्याख्यान झाले. या ज्योतिष संमेलनाची थोडक्यात हकीकत अशी आहे की पंचांग शोध- नाचे उरलेले काम पुरे करावे हा संमेलनाचा हेतु होता. बाहेर गावाहून सुमारे सत्तर पंचाहत्तर ज्योतिषी व धर्मशास्त्री हजर होते. ज्योतिष विषय हा कळण्याला कठिण तथापि टिळक त्यात भाग घेणार हे ऐकून संमेलनाला प्रेक्षक लोकांची गर्दी झाली होती. स्वागताध्यक्ष केशवराव छापखाने वकील यांचे भाषण झाल्या- धर अध्यक्ष कोल्हटकर यानी ज्योतिष विषयासंबंधाने पूर्ण माहितीने भरलेले व त्यातल्या त्यात विनोदी असे भाषण केले. भारतीय ज्योतिषाची वाढ कसकशी होत गेली ते सांगून नाक्षत्र वर्ष हे भारतीय पंचांग पद्धतीचे एक महत्त्वाचे अंग कसे होऊन बसले याचे त्यानी विवरण केले. नाक्षत्रपद्धति आणि सांपातिक पद्धति यांचा विरोध दिवसेदिवस अधिकाधिक स्पष्ट कसा होत जाणार याचे विनोदी भाषेने चटकदार वर्णन केले. पूर्वीचे सिद्धांत ग्रंथकार केवळ शब्दप्रामाण्य मानणारे नसून वेधप्रामाण्य मानणारे होते. त्यानी वेदांग ज्योतिषपद्धति वेधाशी जुळेनाशी झाल्याबरोबर ती सोडून दिली पण आपण मात्र अजून दृक्प्रत्ययाला मान देत नाही. म्हणून पंचांगात सुधारणा कसकशी होत आली हे सूर्यसिद्धांतापर्यंत व नंतर भास्कराचार्यापर्यंत आणून त्यानी सांगितले. व शेवटी विनंति केली की शास्त्रीय अयनांश शुद्ध अयनगति व नाक्षत्रवर्षमान व सूक्ष्मग्रहगति अशा मार्गाने गेल्या- शिवाय पक्षभेद नाहीसे होऊन प्रगति होणार नाही. ता. १६ सोमवार रोजी सर्व दिवसभर खल होऊन संध्याकाळी विषयमंडळात ठरलेले काही ठराव मंजूर झाले. तिसरे दिवशी सायनवादी लोकाकडून काही उपसूचना वगैरे आल्या. त्याहि दिवशी विषयमंडळाचे काम चालले होते. शेवटी उरलेले ठराव मंजूर होऊन त्याप्रमाणे नवीन करणग्रंथ करवून घ्यावा असे ठरले. शेवटी संमेलनाने शंकरा- चार्याच्या हस्ते टिळकाना मानपत्र दिले. संमेलनात ठराव झाले ते असे: - ( १ ) वर्षमान घ्यावयाचे ते सूर्यसिद्धांताप्रमाणे नाक्षत्र घ्यावे पण बीजसंस्कार करून घ्यावे (२) प्रत्यक्ष वेधाने येईल ते अयनगतीचे मान समजावे (३) जुन्या सिद्धांत- ग्रंथात सांगितल्याप्रमाणे निश्शर रेवती योगतारा हेच राशिचक्राचे आरंभस्थान मानावे ( ४ ) नवीन करणग्रंथात या आरंभापासून वेधाने येतील ते अयनांश